- खास प्रतिनिधी
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी शिवसेना उबाठाकडून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) टार्गेट होत असताना उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या पंकजा मुंडे यादेखील अडचणीत येण्याशी शक्यता निर्माण झाली आहे. उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांनाही मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.
(हेही वाचा – Property Tax : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मालमत्ता कराची वसुली ५८ टक्के)
बंधू-भगिनीविरुद्ध दंड थोपटले
भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये बीडमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आणि त्यानंतर विरोधी पक्षांनीही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सरकारला धारेवर धरले. सध्या उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी मुंडे बंधू-भगिनीविरुद्ध दंड थोपटले असून दोघांचाही मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाकडून धनंजय मुंडे यांची वर्णी मंत्रिमंडळात लागली असून त्यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खाते सोपविण्यात आले आहे. तर त्यांची बहीण पंकजा मुंडे या भाजपाच्या सदस्या म्हणून मंत्रिमंडळात समावेश झाला असून त्यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी आहे. (Dhananjay Munde)
(हेही वाचा – Boxing Day Test : ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही जेव्हा मैदानावरील वर्तणुकीसाठी दंड झाला होता…)
एकही मुंडे मंत्रिमंडळात नको
गुरुवारी २६ डिसेंबर आणि शुक्रवारी २७ डिसेंबर २०२४, असे सलग दोन दिवस संजय राऊत यांनी पंकजा आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी करीत आहेत. “सरपंच संतोष देशमुख हत्याकांड ज्यांनी घडवले ते मंत्रिमंडळात आहेत. कोणी भाजपामध्ये आहे तर कोणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत,” असे राऊत गुरुवारी म्हणाले आणि मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे केली. तसेच शुक्रवारी राऊत म्हणाले, “मुळात मुंडे यांना मंत्रिमंडळात घेणे ही चूक झाली. ज्या हत्यांचा तपास सुरू आहे तो निपक्ष पारदर्शक व्हायचा असेल तर एकही मुंडे मंत्रिमंडळात असता कामा नये.”
उद्धव ठाकरे हे पंकजा मुंडे यांना बहीण मानतात. उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर पंकजा यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या तर उद्धव यांनी त्यांना उत्तर देत ‘पंकजाताई’ असे संबोधून ‘गोपीनाथ मुंडे यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेन,” असे आश्वासन दिले होते. उद्धव यांनी पंकजा यांचा बहीण म्हणून उल्लेख अनेकदा केला आहे. आता पंकजा उबाठामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community