Waqf Bill : शिवसेना उबाठाची पळापळ!

129
Waqf Bill : शिवसेना उबाठाची पळापळ!
  • खास प्रतिनिधी 

वक्फ दुरुस्ती विधेयकावरून शिवसेना उबाठाची मोठी अडचण झाली असून उबाठा खासदार संजय राऊत यांची माध्यमांसमोर वक्फच्या प्रश्नावर पळापळ सुरू झाली. (Waqf Bill)

काय म्हणाले रिजिजू?

वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी २ एप्रिल या दिवशी संसदेत मांडले जाऊ शकते. सरकार प्रथम हे विधेयक लोकसभेत मांडेल. हे सत्र ४ एप्रिलपर्यंत सुरू राहील. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू म्हणाले की, आम्ही वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्याची तयारी करत आहोत. संसदेबाहेर या विधेयकावर व्यापक चर्चा झाली आहे. आपण सभागृहातील वादविवाद आणि चर्चेत देखील भाग घेतला पाहिजे. ते पुढे म्हणाले की, सरकार मुस्लिमांची मालमत्ता आणि अधिकार हिसकावून घेणार आहे असे सांगून निष्पाप मुस्लिमांची दिशाभूल केली जात आहे. (Waqf Bill)

(हेही वाचा – युट्यूबर Ranveer Allahabadia याला पासपोर्ट देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार)

आधी मित्रपक्षांनी भूमिका जाहीर करावी

शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी राऊत यांना वक्फ विधेयकावर आपल्या पक्षाची भूमिका काय आहे, असे विचारले असता राऊत बिथरले. “येऊ द्या ना विधेयक. आल्यावर बोलू यावर,” असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावर पत्रकारांनी पुन्हा विषय काढत उद्याच (मंगळवारी ३ एप्रिल) हे विधेयक संसदेत मांडले जाईल याकडे लक्ष वेधले, तेव्हा राऊत म्हणाले, “खरं म्हणजे यावर नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान, अपना दल हे जे मोदी यांच्या सरकारमधील मित्र पक्ष आहेत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे. मग आम्ही आमचं मत व्यक्त करू.” (Waqf Bill)

मुस्लिम दुरावला जाण्याची भीती

लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठाला मुस्लिम मतांनी तारले, असे काही मतदारसंघातील मतदानाच्या पॅटर्नवरुन दिसून येते. तेव्हापासून शिवसेना उबाठाने मुस्लिम समाजाबाबत मवाळ भूमिका घेण्यास सरूवात केली असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीतही उबाठाकडून मुस्लिम मतांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून काही प्रमाणात ‘त्या’ पॅटर्नचा लाभ झाल्याचे स्पष्ट होते. परिणामी, वक्फ बोर्ड विधेयकावर काय भूमिका घ्यावी, या कात्रीत उबाठा सापडला आहे. वक्फच्या बाजूने भूमिका घेतली तर हिंदू समाजाची नाराजी ओढवली जाऊ शकते तर वक्फच्या विरोधात भूमिका घेतली तर मुस्लिम मतदार पुन्हा दुरावला जाण्याची भीती आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Waqf Bill)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.