Shiv Sena UBT : प्रभागातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश; उबाठाचे माजी नगरसेवक लवकरच शिवसेनेत

101
Shiv Sena UBT : प्रभागातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश; उबाठाचे माजी नगरसेवक लवकरच शिवसेनेत
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर पडत असल्याने माजी नगरसेवकांना आपल्या प्रभागातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आता अपयश येऊ लागले आहे. निवडणूक लांबणीवर पडत आहे, तस तसा माजी नगरसेवकांचा धिर सुटत चालला असून आता नगरसेवक नसल्याने लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणे शक्य होत नसल्याने उबाठा शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवक हे एकनाथ शिंदे मुख्य नेता असलेल्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. (Shiv Sena UBT)

उद्धव ठाकरे यांनी उबाठा शिवसेनेच्या सर्व माजी नगरसेवकांची मंगळवारी बैठक घेऊन त्यांना आगामी निवडणुकीच्या कामाला लागण्याबाबत मार्गदर्शन केले. मात्र, ही बैठक केवळ नगरसेवक फुटू नये यासाठी घेतली गेल्याचे बोलले जात आहे. मुंबई महापालिकेची मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली असून तेव्हापासून महापालिकेचा कारभार नगरसेवकाअभावी प्रशासकाच्या माध्यमातून चालवला जात आहे. मात्र पावणे तीन वर्षे मुंबई महापालिकेचे सार्वत्रिक निवडणूक न झाल्याने माजी नगरसेवकांना आपल्या विभागातील जनतेला भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचीही हिंमत होत नाही. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – Chief minister म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणारे Devendra Fadnavis तिसरे!)

काही माजी नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, प्रभागात जनतेच्या सेवा सुविधांसाठी पाठपुरावा करुन त्यांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न नगरसेवक म्हणून आम्ही करत असलो तरी आता नगरसेवक नाही. नगरसेवक नसल्याने प्रभागांतील विकास कामे करण्यासाठी महापालिकेचा विकास निधी उपलब्ध नाही, नगरसेवक निधी नाही. मग आम्ही कुठून करणार कामे असा सवाल करत माजी नगरसेवकांनी, विभागातील जनतेला सेवा सुविधांच्या कामांसह मंडळांचे कार्यक्रम यासाठीही मदत करावी लागते. त्यासाठी जेवढे करता येत होते, तेवढे आतापर्यंत मदत करत आलो, पण आता आर्थिक क्षमताही राहिलेली नाही. त्यामुळे एक तर गप्पा बसा नाही तर शिवसेनेत जाऊन प्रभागातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून घ्या हाच पर्याय राहिलेला आहे. (Shiv Sena UBT)

आता पक्षात एकनिष्ठेलाही किंमत राहिलेली नसून जर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही तर भविष्यात महापालिकेच्या निवडणुकीला आम्ही कसे सामोरे जाणार हाच प्रश्न आहे. त्यामुळे पक्षाने आर्थिक रसद पुरवली तरच जनतेच्या अपेक्षा पूर्ण करता येतात. पण उबाठा शिवसेना पक्षाकडून या अपेक्षाही पूर्ण होत नसल्याने गपगुमान घरी बसावे यापेक्षा वेगळा मार्ग नाही. अन्यथा शिवसेना पक्षात गेल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अनेकांनी राजकारणातील आपले स्थान कायम ठेवण्यासाठी आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची मनाची तयारी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यानंतर येत्या काही दिवसांत उबाठा शिवसेनेचे काही माजी नगरसेवक शिवसेना तसेच भाजपात प्रवेश केलेले दिसून येतील, असेही बोलले जात आहे. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.