- खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांवर राज्यात ९ खासदार निवडून आल्याने शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) आता बांगलादेशी मुस्लिमांनाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
पोलिसांचा दावा राजकीय
अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशी मुस्लिम असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी बांगलादेशी मुस्लिमांची पाठराखण करत ‘पोलिसांचा दावा हा राजकीय दावा आहे’, असे विधान केले.
(हेही वाचा – हिंदू धर्मावर होणारे मुस्लिम व ख्रिश्चनीकरणाचे आक्रमण थांबवा; Mahant Ramgiri Maharaj यांचे विधान)
खापर दुसरीकडे फोडत असाल तर ते चुकीचे
मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत राऊत पुढे म्हणाले, “बांगलादेशी आले कसे, घुसले कसे, गेल्या दहा वर्षात मुंबईकरांमध्ये पोहोचले कसे? यासाठी जबाबदार कोण? दिल्लीमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, मुंबईत बांगलादेशी आहेत. बांगलादेशी चाकू घेतो आणि अत्यंत सुरक्षित सैफ अली खानच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला करतो, हा सगळा प्रकार अत्यंत रहस्यमयी आहे. तुम्ही काहीतर लपवत आहात आणि त्याचे खापर दुसरीकडे फोडत असाल तर ते चुकीचे आहे.”
चिलीम मारून बोलू नका
राऊत पुढे म्हणाले, “मग या भाजपाच्या लोकांना मला असे म्हणायचे आहे की, हा भाजपाचा डाव आहे. बीडमध्ये संतोष देशमुख यांचा खून झाला तो बांगलादेशी आहे का? सोमनाथ सुर्यवंशींचे खुनी बांगलादेशी आहेत का? जरा डोकं ठिकाणावर ठेवून बोला, चिलीम मारून बोलू नका,” असे म्हणत राऊत यांनी सैफ अली खान प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. (Shiv Sena UBT)
(हेही वाचा – Guardian Minister : पालकमंत्री पदावरून इतका रुसवाफुगवा का? काय अधिकार असतात पालकमंत्र्यांचे? जाणून घ्या…)
पालिकेच्या निवडणुका म्हणून बांगलादेशी..
“बांगलादेशी हा या देशाला धोका आहे. बांगलादेशी, रोहिंगे यांना ताबडतोब या देशातून बाहेर काढलं पाहिजे. सगळ्यात आधी पंतप्रधान मोदी यांनी शेख हसीना यांना बांगलादेशी म्हणून जो आश्रय दिला आहे, त्यांना बाहेर काढता का आधी. प्रत्येक गोष्टीत धर्माचे राजकारण करताय. हा किरीट सोमय्या तो गेला तिथे बांगलादेशींकडे. हिंमत असेल तर संतोष देशमुख यांचा खुन केला, परभणीत पोलीस कोठडीत सोमनाथ सुर्यवंशीला कोणी मारलं हे विचारा आधी. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून हे बांगलादेशी, बांगलादेशी करत आहेत,” असा सवाल करत बांगलादेशी विषयाचे राजकारण करण्याचा प्रयत्न राऊत यांनी केला. (Shiv Sena UBT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community