Shiv Sena UBT अद्याप वैफल्यग्रस्त; विधानसभा पराभावाचे खापर ‘ईव्हीएम’ वर

67
Shiv Sena UBT अद्याप वैफल्यग्रस्त; विधानसभा पराभावाचे खापर ‘ईव्हीएम’ वर
  • खास प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची सल शिवसेना उबाठाच्या मनातून अद्याप कायम आहे. आजही उबाठा ईव्हीएमच्या नावाने खडे फोडत आहे. यातूनच विधानसभा आणि एका साखर कारखान्याच्या निवडणुकीची तुलना शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी केली आणि वैफल्य व्यक्त केले. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – भाजपा नेते Kirit Somaiya यांना जीवे मारण्याची धमकी; युसूफ अन्सारीविरोधात गुन्हा दाखल)

‘ईव्हीएम’ वर खापर

संजय राऊत सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेला विजय हा पैशांची ताकद आणि ईव्हीएमच्या घोटाळ्यांवर मिळवला आहे. ईव्हीएमचे घोटाळे आपण म्हणत आहोत, कारण दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. याच ठिकाणी चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार मनोज घोरपडे हे बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस-शप) यांच्यासारख्या नेत्याचा ईव्हीएमद्वारे पराभव करत ५० हजाराच्या मताधिक्याने निवडून आले. तिथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाटील यांचे पॅनल प्रंचड मताधिक्याने जिंकले. या निवडणुका मतपत्रिकेवर झाल्या. तोच मतदार, तेच क्षेत्र, तीच माणसं फक्त त्यावेळी ईव्हीएमवर मतदान झाल्याने घोरपडे जिंकून आले आणि आता मतपत्रिकेवर मतदान झाल्याने पाटील यांच्या पॅनलच्या सर्वच्यासर्व २१ जागा जिंकून आल्या आहेत. याचाच अर्थ ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचे दिसून आले,” अशा भावना राऊत यांनी व्यक्त केल्या. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – MMR साठी चार लाख कोटींचे सामंजस्य करार)

विधानसभेची तुलना कारखान्याशी

विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीने काँग्रेस-शिवसेना उबाठा-राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडवला. महायुतीने २८८ पैकी २३२ जागा पटकावल्या तर विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीला ५० चा आकडाही गाठता आला नाही. यांची सल राऊत यांच्या मनात आजही असून विधानसभेची तुलना एका साखर कारखान्याशी करून ते वैफल्य बाहेर काढण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.