-
खास प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते जयंत पाटील (Jayant Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक झाली, यावरून शिवसेना उबाठा नेते संजय राऊत चांगलेच संतापले. त्यांनी त्यांची तडफड माध्यमांसमोर व्यक्त करत राजकारणामध्ये संवाद ठेवला पाहिजे या दांभिक गोष्टींवर आमचा विश्वास नाही, असे म्हणत शरद पवार यांनाही टोला हाणला आणि आम्ही फाटकी माणसं, असे म्हणत स्वतःची किंमत केली.
(हेही वाचा – Disha Salian Case : आदित्य ठाकरेंवर गु्न्हा दाखल करण्याचा निर्णय २ एप्रिलला)
आम्ही टाळतो, तुम्हीही नका जाऊ
पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, जयंत पाटील (Jayant Patil) यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. याबाबत न्यूज चॅनल पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न केला असता राऊत उसळले. “त्यांचं उत्तम चाललेलं असतं. शिवसेनेतून जे काही लोक सोडून गेले आम्ही शक्यतो त्यांच्या वाऱ्यालाही फिरकत नाही. ज्या प्रकारे त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्या आसपाससुद्धा जात नाही. यांचं बरं असतं यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट होती, नका जाऊ. विद्या प्रतिष्ठान असतं, रयत शिक्षण संस्था असते, आमच्याकडे असं काही नाही. त्यामुळे आमच्या भेटी गाठी कुणाशी होत नाही आणि होण्याची वेळ आली तरी आम्ही टाळतो,” असे राऊत म्हणाले.
(हेही वाचा – १७ वर्षे लेखापरीक्षण अहवाल सादर न करणारे Waqf Board बरखास्त करा; ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी)
आम्ही फाटकी माणसं, भांडत राहू
“राजकारणात संवाद ठेवला पाहिजे अशा दांभिक गोष्टींवर आमचा विश्वास नाही. ज्यांनी आमचा पक्ष फोडला, ज्याने महाराष्ट्राशी बेईमानी केली, महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी महाराष्ट्राच्या शत्रू पुढे गुडघे टेकले त्यांना कितीही संधी असली तरी भेटणार नाही, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी “आम्ही फाटकी माणसं आहोत रस्त्यावरची. आमच्याकडे संस्था वगैरे नाही. आम्ही भांडत राहू, लढत राहू व धडा शिकवू, असे देखील म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community