-
सुजित महामुलकर
शिवसेना उबाठाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तिय मिलिंद नार्वेकर यांच्या एका ‘X’ पोस्टमुळे महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांच्याकडे गृह खाते आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते सतत टीका करत असताना नार्वेकर यांनी त्यांचे, ‘वाल्मिक कराड शरण आल्याबद्दल अभिनंदन’ केले. (Shiv Sena UBT)
(हेही वाचा- Rohit Sharma : रोहित शर्माचा सरत्या वर्षाला निरोप देणारा व्हीडिओ व्हायरल )
नेमके काय म्हटले आहे पोस्टमध्ये?
‘मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीला शरण आला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला जी यांचे अभिनंदन!’ असे मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Shiv Sena UBT)
.. म्हणून ठाकरे विश्वासार्ह वाटत नाही
यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केवळ, ‘खरं की काय?’ इतकी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर अनेकांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांना टॅग करत सवाल केला की नार्वेकर नक्की कुणाचे? अनेक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला तर एकाने उद्धव ठाकरे का विश्वासार्ह वाटत नाही.. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. (Shiv Sena UBT)
(हेही वाचा- मणीपूरमध्ये संपूर्ण वर्ष अत्यंत दुर्दैवी गेले; CM Biren Singh यांनी मागितली क्षमा)
काही निवडक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे जशाच्या तशा:
‘तू नक्की ठाकरेंचा आहे की आणखी कोणाचा?’
‘महाशय तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहॆ MVA / NDA महाशय तुम्ही नक्की कोणत्या पक्षात आहॆ SS UBT / BJP आम्ही नक्की कोणाला सपोर्ट करायचा’
‘हा माणूस हे एकमेव कारण ज्याच्यामुळे उध्दव ठाकरे आणि यांची शिवसेना विश्वासार्ह वाटत नाही’
‘आर येडा का खुळा रे तू…. उद्धवाचं दुकान तूच बसवलं रे बाबा’
‘विकासासाठी बाहेर पडायची लक्षण’
‘शिवसेना UBT पक्ष का मागे पडतोय..ते जरा दिसतेय इथे ..’
‘तुझा सारख्या लोकान मुळे मुळ शिवसेना डूबली गद्या, अभिनंदन कधी करावं आणि प्रश्न निर्माण कधी करावं तुला कळणार नाही मूर्ख माणसं’
‘काही पर्याय नाही निधी साठी आणि पक्ष चालवण्यासाठी निधी लागतो म्हणून हा नार्वेकर हातचा पाळून असतो आतून सगळे मिळालेले आहेत’
‘थोडं गांजा कमी मार रे बाबा, हे अति होतय…’
‘हे ट्विट Burnol च काम करेल’
(हेही वाचा- Ministry Entrance Pass : आता घरबसल्या मंत्रालयातील प्रवेशाचा पास ॲपवरून काढता येणार)
‘पुढच्या वेळेस विधानपरिषद देवाभौ कडून च घेणार बहुतेक’
‘बहुतेक आता तुम्हाला राज्याचा उपमुख्यमंत्री व्हायचं वाटत..त्यादृष्टीने तुमचे वाटचाल चालू आहे…’
‘साहेब तुम्ही असे आहात की उद्धव ठाकरे ना हवे असले तरी काढू शकणार नाहीत’
‘अहो नार्वेकर, तो पोलिसांना सापडला नाही. तो स्वतः शरण गेला आहे. आता हे यश समजायचे की अपयश हे तुम्हीच ठरवा. बाकी दोस्ती तुटायची नाय हे स्टेटस् ठेवायला हरकत नाही, बरोबर ना @AUThackeray @rautsanjay61’
‘परळीतून पुण्याला समर्थनार्थ गाड्या गेल्या. त्यांच्या हजारो लोकांना माहित होत की कुठं आहेत, कधी सरेंडर होणार, वगैरे. पण पोलिसांना, CID ला माहीत नसावं..? वा’
घर का भेड़ी है यह, इसका भाई वहा है ना भाजपा मे’
‘सर हे ट्विट डिलीट झालं तर बरं होईल! आपलेच नेते त्याच्यावर टीका करतात आणि आपणच त्याचं कौतुक करताय!’
‘कधी काय ट्विट करावं हे कळण्याईतके तुम्ही नादान नाहीयेत…आपण कोणत्या गोष्टी बद्दल बोलत आहोत ते तरी लक्षात ठेवा.@OfficeofUT यांचा नेमकी काय विचार आहे एकदा विचारून घ्या. खजप खाजेपी करत असतात’
‘2024 वर्षाच्या निरोपाचे सर्वोत्तम विधान . 2025 मध्ये तेच चालू ठेवा.’
(हेही वाचा- America : चिनी हॅकर्सकडून अमेरिकेचा वित्त विभाग हॅक)
‘याचं नेमकं दुखणं काय आहे ते एकदा पक्षश्रेष्ठींनी विचारून घ्यायला पाहिजे. लई कमळीचा पुळका आला असेल तर याला पणं ढुंगणावर लाथ मारायला काही हरकत नाही. कमीत कमी जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम तरी निर्माण होणार नाही. @ShivSenaUBT_ @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61’
हेही पहा-
Join Our WhatsApp Community