पुण्यात (Pune) शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) पक्षाला भाजपाने जोरदार धक्का दिला आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे (Shiv Sena UBT) पाच माजी नगरसेवकांनी भाजपात (BJP) पक्षप्रवेश केला आहे. यात माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची आल्हाट यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) , केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol ), राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, संघटन पर्व प्रभारी रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), शहराध्यक्ष धीरज घाटे हे उपस्थित होते.
( हेही वाचा : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये Zero Prescription Policy कागदावरच)
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गावर या सर्वांनी मार्गक्रमण केले याचा मनस्वी आनंद आहे. भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. तो समर्पित कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे दि. ७ जानेवारी रोजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणे समाजापर्यंत पोहचवावी. (Shiv Sena UBT)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community