महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठाने (Shivsena UBT) मुंबईतील पाच जागांची मागणी केली असून हाच आता वादाचा मुद्दा ठरला आणि जागावाटप रखडले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
पाच जागा लढवण्याचा आग्रह
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबबत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) आज गुरुवारी 22 फेब्रुवारीला मुंबईत बैठक झाली असून कॉँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी जागावाटपावरून मविआत (Mahavikas Aghadi) कोणतेही मतभेद नाहीत, असे जाहीरपणे सांगितले असले तरी उबाठाने(Shivsena UBT) मुंबईतील सहापैकी पाच जागा लढवण्याचा आग्रह धरल्याने जागावाटप रखडले आहे.
(हेही वाचा- Narayan Rane यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट )
कॉँग्रेस नेते संजय निरुपम नाराज
मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघांपैकी दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई आणि उत्तर मुंबईसाठी उबाठा इच्छुक असून केवळ उत्तर-मध्य मुंबई कॉँग्रेससाठी (Congress) सोडण्याची तयारी दर्शवली. कॉँग्रेसने उत्तर-पश्चिमसाठी काही प्रयत्न केले नसल्याने या मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले कॉँग्रेस नेते संजय निरुपम नाराज आहेत. यामुळे निरुपम यांनी पुढील काळात कॉँग्रेस (Congress) सोडण्याचा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटाणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Shivsena UBT)
घोसाळकर कुटुंबात उमेदवारी?
उबाठाने दक्षिण मुंबईसाठी अरविंद सावंत, दक्षिण-मध्य साठी अनिल देसाई, उत्तर-पश्चिम मतदार संघात विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. उत्तर मुंबई मतदार संघाची मागणी अचानक पुढे आल्याने उबाठाकडून माजी नगरसेवक अभिषेक घोसळकर कुटुंबात उमेदवारी देऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अभिषेक यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर उबाठाचे उपनेते असून पत्नी तेजस्वी माजी नगरसेविका आहेत. (Shivsena UBT)
(हेही वाचा- Haldwani Violence : दंगलखोरांना वाटले पैसे; सलमान खान पोलिसांच्या रडारवर )
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (NSCP) मुंबईत अस्तित्व संपल्याने पक्षाने मुंबईत एकाही जागेचा आग्रह धरला नाही.
काँग्रेसने (Congress) जाहीर केल्याप्रमाणे आता २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक (Mahavikas Aghadi) होणार असून त्या बैठकीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, अशी चेन्नीथला यांनी दिली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community