Shiv Sena UBT ने टाकली ‘मविआ’त काडी; Sanjay Raut म्हणाले ‘हिंमत असेल तर ‘मुख्यमंत्री’ उमेदवार द्या’

166
Shiv Sena UBT ने टाकली ‘मविआ’त काडी; Sanjay Raut म्हणाले ‘हिंमत असेल तर ‘मुख्यमंत्री’ उमेदवार द्या’

शिवसेना उबाठाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले. काँग्रेस राष्ट्रवादीने हिंमत असेल तर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा, असे थेट आव्हान देत महाविकास आघाडीत काडी टाकली. (Shiv Sena UBT)

उद्धव ठाकरेंच्या मनातील सुप्त इच्छा

शुक्रवारी १६ ऑगस्टला मुंबईत महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सगळ्यात आधी भाषण करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) कोर्टात बॉल टाकला. उद्धव ठाकरे यांनी मनातील सुप्त इच्छा व्यक्त करत महाविकास आघाडीतील दोन्ही मित्रपक्षांना मुख्यमंत्री पदाचा चेहेरा जाहीर करण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या उत्तराची वाट पहात बसले.

(हेही वाचा – Kolkata Doctor Rape case प्रकरणी राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यात जुंपली)

पवारांनी दुर्लक्ष

मात्र ठाकरे यांचा अपेक्षाभंग झाला. काँग्रेसने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला पण अपेक्षेप्रमाणे नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे यांचा प्रस्ताव फेटाळून लावत ज्या पक्षाच्या विधानसभा निवडणुकीत जास्त जागा निवडून येतील, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे स्पष्ट केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तर ठाकरे यांच्या आवाहनाकडे साफ दुर्लक्ष करत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

त्यामुळे शनिवारी (१७ ऑगस्ट) ला संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेत या विषयावर बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना उकसवत त्यांनी हिम्मत असेल तर मुख्यमंत्री पदाचा चेहेरा जाहीर करावा, असे आव्हान दिले. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.