- खास प्रतिनिधी
राज्यात महायुती सरकारची ‘लाडकी बहीण’ योजनेची लोकप्रियता वाढत असल्याने महाविकास आघाडीत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून न्यायालयामार्फत योजनेला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा आणि योजना बदनाम करण्याचे प्रयत्न महाविकास आघाडीकडून सतत होत आहेत. गुरुवारी ५ सप्टेंबरला तर शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) प्रवक्ते संजय राऊत यांनी कहरच केला. योजनेच्या १,५०० रुपयांची तुलना थेट ‘दारूच्या पेग’सोबत करून अकलेचे तारे तोडले.
(हेही वाचा – Mumbai Crime शाखेची कौतुकास्पद कारवाई, ड्रग्स माफियांना अटक करून काढली वरात)
एक पेग पंधराशेचा
नेहमीप्रमाणे सकाळच्या बुलेटीनमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, “बहिणींना पंधराशे, शेतकऱ्यांना पंधराशे.. त्यांचे पंधराशेचं लिमिट आहे. त्यांचा सगळ्यांचा एक पेग पंधराशेचा आहे. त्याच्यावर त्यांची नशा जात नाही.” (Shiv Sena UBT)
ये कैसे बुद्धी के लोंग है
त्यांच्या बोलण्याची एक क्लिप शिवसेनेचे (शिंदे) समाज माध्यम प्रमुख राहुल कणाल यांनी ‘X’वर पोस्ट केली आणि ‘Shame!!!, राऊत महिला आणि कर्मचारी १५०० रुपयांचा उपयोग दारू पिण्यासाठी करतात असे म्हणत आहेत..’ अशी टिप्पणी करत पुढे म्हटले, “ये कैसे बुद्धी के लोंग है कया पता.. Sad!!! नशा ऐसे लोगो को है पॉवर का, मेहनती इन्सान यंहा हक से रहेता है.. इनके जैसा झूठ से नही’ असे मत वयात केले. (Shiv Sena UBT)
(हेही वाचा – Telangana मध्ये मुसलमान रिक्षाचालकाने आदिवासी महिलेवर केले लैंगिक अत्याचार)
बाळासाहेबांनी गोळी घातली असती
यावर प्रतिक्रिया देताना एका नेटकाऱ्यानेही ‘संजय राऊत Shame Shame’ असे म्हटले तर एकाने ‘बाळासाहेब असते तर पहिली गोळी याला घातली असती,’ अशा शब्दात संताप व्यक्त केला. (Shiv Sena UBT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community