Shiv Sena UBT : …तर शिवसेना उबाठाला फिफ्टी पार करणे कठीण !

121
Shiv Sena UBT : …तर शिवसेना उबाठाला फिफ्टी पार करणे कठीण !
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) पक्षाने स्बळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागप्रमुखांसह माजी नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका मातोश्रीवर घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, स्वबळावर उबाठा पक्ष लढल्यास किमान ५० नगरसेवक निवडून आणण्यात यशस्वी ठरतील, परंतु आघाडी केल्यास शिवसेना उबाठाच्या संख्याबळात तेवढी वाढ होणार नाही, उलट काँग्रेसचाच फायदा होईल असाच तर्क लावला जात आहे.

मुंबई महापालिकेच्या सन २०२७च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे ८४ आणि भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. परंतु मार्च २०२२मध्ये या महापालिकेची मुदत संपुष्टात आली होती, त्यावेळी शिवसेनेचे संख्या ९ आणि भाजपाचे संख्या ८३ एवढे होते, तर काँग्रेस २९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ०८, मनसे ०१, समाजवादी ०६, एआयएमआयएमचे २ असे संख्याबळ होते. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये शिवसेना उबाठाचे तीन, काँग्रेसचे एक, भाजपाचा एक आणि शिवसेनेचे एक अशाप्रकारे खासदार निवडून आले आहेत. तर विधानसभा निवडणुकीत मुंबईत ३६ विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाचे १५, शिवसेना उबाठाचे १०, शिवसेनेचे ०६, काँग्रेसचे ०३, राष्ट्रवादी काँग्रेस आपचे ०१ आणि समाजवादी पक्षाचे ०१ अशाप्रकारे आमदार निवडून आले आहेत.

(हेही वाचा – सुरेश धस यांनी माफी मागावी, अन्यथा…; अभिनेत्री Prajakta Mali ने दिला इशारा)

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे २२ आणि महाविकास आघाडीचे १४ आमदार निवडून आल्याने आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीत राहून कोणताही फायदा होणार नाही आणि जागा वाटपांचा तिढा अधिक वाढेल या भीतीने शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) मुंबईतील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी तसेच महापालिकेवरील आपल्या पक्षाचा झेंडा कायम ठेवण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.

मुंबईतील शिवसेनेच्या ९४ नगरसेवकांपैंकी आधीच ३५ हून अधिक माजी नगरसेवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना उबाठाकडे (Shiv Sena UBT) आता केवळ ५०च्या लगबग माजी नगरसेवक उरले असून भविष्यात अजुन काही नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे भविष्यात विद्यमान नगरसेवकांची संख्या कमी होणार असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी सर्व शाखाप्रमुखांना घरोघरी पोहोचून कामे करण्याच्या सूचना दिल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – Maha Kumbh 2025 मध्ये लाइट अॅण्ड साऊंड शोद्वारे सादर होणार पौराणिक कथा; 2000 ड्रोनचा वापर होणार)

शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) जर स्वबळावर लढल्यास त्यांना ५० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येण शक्य नसून जर ही निवडणूक एप्रिलपर्यंत झाल्यास यापेक्षा अधिक नगरसेवक निवडून येणे अशक्य असल्याचे राजकीय जाणकरांचे म्हणणे आहे. परंतु ही निवडणूक जर लांबणीवर जावून ऑक्टोबर, नोव्हेबरपर्यंत गेल्यास शिवसेना उबाठाचे संख्याबळ चांगल्याप्रकारे वाढली जाऊ शकते असेही बोलले जात आहे.

मात्र, महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) लढल्यास आधीच जागा वाटपावरून जो वाद होईल त्याचा फायदा शिवसेना आणि भाजपाला होईल. त्यातच महाविकास आघाडीचा फायदा शिवसेना उबाठापेक्षा काँग्रेसला अधिक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना उबाठाला स्वबळाच्या तुलनेत आठ ते दहा जागा वाढतील असेही बोलले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा ६० ते ६५ जागांच्या पुढे जाणार नाही असाही अंदाज आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.