Shiv Sena UBT सांगलीच्या विश्वजित कदमांचा करणार किरीट सोमय्या?

117
Shiv Sena UBT सांगलीच्या विश्वजित कदमांचा करणार किरीट सोमय्या?
  • खास प्रतिनिधी

सांगलीच्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा ‘किरीट सोमय्या’ करण्याची तयारी शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

भाजपाने नमते घेतले

२०१४ मध्ये विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपा वेगळे लढल्यानंतर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपाशी युती केली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपाला एक अट टाकली, ती अशी की, किरीट सोमय्या यांना ईशान्य मुंबई मतदारसंघातून तिकीट देऊ नये. वास्तविक भाजपाने सोमय्या यांना त्याच मतदारसंघातून तिकीट देण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र, केवळ ठाकरे यांचा आग्रह मोडू नये, यासाठी नमते घेत, सोमैय्या यांना कुठल्याच मतदारसंघातून तिकीट दिले नाही.

(हेही वाचा – राज्यातील विधानसभा निवडणूक कधी होणार? CM Eknath Shinde यांनी दिले संकेत)

सोमैय्या यांच्या राजकीय कारकिर्दीला खीळ

२०१४ मध्ये शिवसेना-भाजपा युती तुटल्यानंतर जसे ठाकरे यांनी ‘आमची २५ वर्षे युतीत सडली’ अशी टीका करण्यास सुरुवात केली तेव्हा भाजपाकडूनही टीका सुरू झाली. किरीट सोमय्या यांनी मात्र टीका करणयासोबत ठाकरे यांचे तथाकथित आर्थिक घोटाळे बाहेर काढत पुरावे देत आरोप करण्यास सुरूवात केली. याचा राग ठाकरे यांच्या मनात खदखदत होता. तो त्यांनी लोकसभा निवडणूक तिकीट वाटापावेळी काढला आणि सोमय्या यांच्या राजकीय कारकिर्दीला खीळ ठोकली. (Shiv Sena UBT)

मुख्यमंत्रीपद पदरात

२०१९ ची विधानसभा निवडणुकही ठाकरे यांनी भाजपासोबत लढली. मात्र निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे यांनी जनतेचा कौल डावलत पारंपारिक विरोधी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले.

(हेही वाचा – Hindus in Bangladesh : बांगलादेशात पोलीस ठाण्यातच झाली हिंदु युवकाची हत्या)

उबाठा तिसऱ्या क्रमांकावर

२०२४ च्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांनी काँग्रेसचा गढ असलेल्या सांगलीत जाऊन, आघाडीत असतानाही, परस्पर चंद्रहार पाटील यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर होता. काँग्रेसतर्फे ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे इच्छुक होते. विश्वजित कदम हे विशाल पाटील यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांनी काँग्रेस हाय-कमांडपर्यंत हा विषय पोहोचवला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर कदम यांनी महाविकास आघाडीचे (उबाठा) उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विरोधात आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी काम केले आणि त्यांना निवडून आणले तर उबाठाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. (Shiv Sena UBT)

कार्यक्रमाला जाणे टाळले

विश्वजित यांच्या या कृतीमुळे ठाकरे यांचा रोष त्यांनी ओढवून घेतला. गुरुवारी ५ सप्टेंबरला विश्वजित यांचे वडील माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कडेगाव येथे पार पडला. या कार्यक्रमाचे निमंत्रण विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीचे घटक उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांनादेखील दिले. पवार कार्यक्रमाला उपस्थित राहिले मात्र, ठाकरे यांनी राग उघडपणे व्यक्त न करता कार्यक्रमाला जाणे टाळले.

(हेही वाचा – Shiv Sena UBT ने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या १५०० रुपयांची तुलना केली ‘दारूच्या पेग’शी)

पाडण्याची रणनीती

ठाकरे यावरच समाधान मानणाऱ्यातले नाहीत, तर विश्वजित यांना येत्या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळू नये, यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, जसे भाजपाकडून किरीट सोमय्या यांचे तिकीट कापले. मात्र, या दबावाला काँग्रेस बळी पडणार नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. काँग्रेसने जर विश्वजित यांना तिकीट दिलेच तर त्यांचा पराभव कसा होईल, यासाठी ठाकरे यांच्याकडून पुढचा प्रयत्न निश्चित करण्यात येईल आणि तशी रणनीती त्यांच्याकडून तयार होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.