शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी शुक्रवारी (७ जून) घुमजाव करत काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने शिवसेना उबाठासाठी लोकसभा निवडणूक प्रचार केला, असे स्पष्टीकरण दिले. त्याचबरोबर एक नवा वादही उत्पन्न केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाचा समाचार घेत राऊत यांनी ‘महाविकास आघाडीत मोठा भाऊ कुणी नाही, तर महाराष्ट्रात शिवसेनाच एक महत्वाचा पक्ष आहे आणि राहील,’ असे सांगून उबाठाच मोठा भाऊ असल्याचे अप्रत्यक्ष जाहीर केले. (Sanjay Raut)
आघाडी म्हणून काम
काल ६ जूनला सकाळच्या सत्रात आयोजित पत्रकार परिषदेत, “शिवसेना उबाठा नसती तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इतक्या जागा निवडून आल्या असत्या का?” असा थेट सवाल राऊत यांनी केला होता. शुक्रवारी त्यांनी घुमजाव करत काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेचा प्रचार केला, शरद पवार यांनी उबाठा आणि काँग्रेसचा तर उबाठाने काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार केला आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम केले, असे सांगितले. (Sanjay Raut)
(हेही वाचा – Congress ला 3 निवडणुकांमध्ये जितक्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त जागा आम्हाला आता मिळाल्या; Narendra Modi यांचा टोला)
काँग्रेस तिथेच होता, आहे…
महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी (शप) आणि उबाठा यांच्यात मोठा भाऊ काँग्रेस होता आणि राहील, असे नाना पटोले यांनी गुरुवारी विधान केले, त्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले, “इथे कुणी लहान आणि मोठा भाऊ नाही. प्रश्न लहान-मोठ्याचा नाही, महाराष्ट्रात शिवसेनाच (उबाठा) महत्त्वाचा पक्ष आहे आणि राहील. आम्ही अत्यंत संघर्षातून संकटातून हा पक्ष निर्माण केला आणि जागा लढवल्या. काँग्रेसचं तसं नव्हतं. काँग्रेसचे चिन्ह, पक्ष हा तिथेच होता,” असे राऊत म्हणाले. (Sanjay Raut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community