शिवसेना महिला आघाडीचे शिवसेना उबाठा खासदार Sanjay Raut यांच्या विरोधात ‘जोडे मारा’ आंदोलन

75
शिवसेना महिला आघाडीचे शिवसेना उबाठा खासदार Sanjay Raut यांच्या विरोधात ‘जोडे मारा’ आंदोलन
  • प्रतिनिधी

शिवसेना महिला आघाडीकडून गुरुवारी शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अवमानजनक भाष्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीने बाळासाहेब भवन येथे ‘जोडे मारा’ आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या ५९व्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न)

राऊत यांच्या फोटोला जोडे मारून निषेध

शिवसेना नेत्या मीना कांबळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिलांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदवला. यावेळी महिला आघाडीच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी संताप व्यक्त करत सांगितले की, “संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यापूर्वीही स्वप्ना पाटकर, कंगना राणावत, नवनीत राणा यांच्यासारख्या महिलांविषयी अवमानकारक वक्तव्ये केली आहेत. राजकारणात टीका करताना भाषा योग्य असली पाहिजे, अन्यथा आज केवळ पोस्टरला जोडे मारले आहेत, पण पुढच्या वेळी तुमच्या तोंडात चप्पल मारल्याशिवाय बाळासाहेबांच्या रणरागिणी शांत बसणार नाहीत.”

(हेही वाचा – दिल्ली परिवहन महामंडळ कर्जबाजारी; BJP सरकारपुढे मोठे आव्हान)

महिला आघाडी आक्रमक

या आंदोलनात शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे, कला शिंदे, तृष्णा विश्वासराव, सुवर्णा करंजे, शिल्पा देशमुख, प्रवक्त्या सुशीबेन शाह यांच्यासह महिला विभाग प्रमुख नीलम पवार, शीतल बित्रा, सुनिता वैती आणि मुंबईतील सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या वक्तव्यांवर माफी मागावी अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. शिवसेना महिला आघाडीच्या आक्रमक पवित्र्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.