Shiv Sena (UBT) : शिवसेनेला घरचा आहेर; शिवसेना जवळपास काँग्रेस झाली आहे, असं कोण म्हणालं ?

103
Shiv Sena (UBT) : शिवसेनेला घरचा आहेर; शिवसेना जवळपास काँग्रेस झाली आहे, असं कोण म्हणालं ?
Shiv Sena (UBT) : शिवसेनेला घरचा आहेर; शिवसेना जवळपास काँग्रेस झाली आहे, असं कोण म्हणालं ?

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. हा पराभव महाविकास आघाडीच्या चांगलाच जिव्हारी लागला असून, विशेषतः शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पराभवानंतर एकमेकांवर दोषारोप सुरू असतानाच, शिवसेना उद्धव ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका केली आहे. (Shiv Sena (UBT))

चिपळूणमधील बैठकीत जाधव यांची ताशेरेबाजी

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या चिपळूण येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे सचिव विनायक राऊत आणि जिल्हा प्रमुख संजय कदमही उपस्थित होते. या बैठकीत जाधव यांनी थेट पक्षातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (Shiv Sena (UBT))

(हेही वाचा- Mahakumbh मेळ्यासाठी जाणार्‍या रेल्वेवर दगडफेक करणार्‍यावर कठोर कारवाई करा; हिंदु जनजागृती समितीची मागणी)

जाधव म्हणाले, “जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करण्याची आमच्यात हिंमत नाही. काम न करणाऱ्यांना फक्त नाराज होऊ नये म्हणून नवीन पद दिले जाते. त्यामुळे शिवसेना जवळपास काँग्रेससारखी झाली आहे.” (Shiv Sena (UBT))

शाखा प्रमुखांच्या कार्यकाळासाठी ठोस पावले उचलण्याची गरज

जाधव यांनी शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांचा कार्यकाळ निश्चित करण्याचा सल्ला दिला. निवडणूक काळात शाखा प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना जाधव म्हणाले की, “पक्षाच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना दुर्लक्षित केल्या जात आहेत, जे पक्षासाठी घातक ठरत आहे.” (Shiv Sena (UBT))

(हेही वाचा- PM Narendra Modi १५ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर)

कोकणातील बालेकिल्ल्यावर फटका

कोकण हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. जाधव म्हणाले, “मी कोकणातून निवडून आलेला एकमेव आमदार आहे. त्यामुळे शिवसैनिकांना शासनदरबारी योग्य मान-सन्मान मिळायला हवा. पक्षाची कार्यपद्धती बदलण्याची गरज आहे, अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल.” (Shiv Sena (UBT))

पक्षात बदलाची गरज

भास्कर जाधव यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी बदल आवश्यक असल्याचा पुनरुच्चार केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा टिकवण्यासाठी जुन्या शिवसैनिकांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  (Shiv Sena (UBT))

(हेही वाचा- Torres Jewelry Scam : मुख्य सूत्राधारांनी फसवणुकीचा कट रचण्यासाठी २५ कोटी रुपये केले खर्च)

भास्कर जाधव यांचे वक्तव्य शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासाठी घरचा आहेर मानले जात आहे. कोकणात पक्षाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षातील निष्क्रिय पदाधिकारी बदलण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. या टीकेमुळे पक्षात अंतर्गत बदलांचे वारे वाहतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Shiv Sena (UBT))

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.