लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून उबाठा शिवसेनेचे अनिल देसाई हे विजयी झाले असले तरी प्रत्यक्षात शिवसेना भवन असलेल्या विधानसभा मतदारसंघात देसाई यांना शिवसैनिकांनी नाकारल्याचे मतदानावरून दिसून येत आहेत. माहीम विधानसभा हा शिवसेनेचा गड मानला जात आहे आणि या विधानसभेचे आमदार सदा सरवणकर हे शिवसेनेकडे असले तरी उबाठा शिवसेनेने या मतदार संघात आपलीच ताकद असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात या निवडणुकीत अनिल देसाई यांना तब्बल १३,९९० मत कमी पडली आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे यांना सुमारे १४ हजारांचे मताधिक्य प्राप्त झाले आहे. (Shiv Sena UBT)
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राहुल शेवाळे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. मुंबईत महायुतीचे केवळ दोन खासदार निवडून येतील आणि हे दोन मतदार संघ उत्तर मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई असतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे यांचा तब्बल पन्नास हजाराहून अधिक मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात उबाठा शिवसेनेचे अनिल देसाई हे अनपेक्षित विजयी ठरले आहेत. अनिल देसाई यांच्या विजयात धारावी आणि अणुशक्ती नगर आणि त्या खालोखाल शीव कोळीवाडा या मतदारसंघाने हातभार लावला. या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम मतदारांनी एक गठ्ठा मतदान महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अनिल देसाई यांच्या बाजूने मतदान केले. (Shiv Sena UBT)
(हेही वाचा – राणाभीमदेवी थाटात वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांचा भ्रमनिरास झालाय; Pravin Darekar यांचा सणसणीत टोला)
देसाई हे मुस्लिम मतांच्या जोरावर विजयी झाले असले तरी परंपरागत माहीम विधानसभा मतदारसंघात देसाई यांना मताधिक्य घेण्यात यश आले नाही. माहीम विधानसभा मतदारसंघात देसाई यांना ५५,४९८ एवढे मतदान झाले तर शेवाळे यांना ६९,४८८ एवढे मतदान झाले. म्हणजेच मतदार संघ आता उबाठा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला नसून तो शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे मतदारांनी दाखवून दिले आहे. तर धारावी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांच्या मतदार संघात देसाई यांना ७६,६७७ मते आणि शेवाळे यांना ३९,८२० एवढे मतदान झाले आहे. या धारावीत मुस्लिम मतांच्या जोरावर देसाई यांना ३६ हजारांचे मताधिक्य तर अणुशक्ती नगर मध्ये देसाई यांना २९ हजारांचे मताधिक्य मिळाले. अणुशक्ती नगर मध्ये देसाई यांना ७९,७६७ एवढे मतदान झाले आणि शेवाळे यांना ५०,६८४ एवढे मतदान झाले. (Shiv Sena UBT)
मतदार संघ…… देसाई…….. शेवाळे…मताधिक्य
अनुशक्ती नगर…७९७६७….५०६८४..+२९०८३
चेंबूर……………६१३५५…..५८४७७..+०२८७८
धारावी…………७६६७७…..३९८२०..+३६८५७
शीव कोळीवाडा ७०९३१….६१६१९..+९३१३
वडाळा…………४९१४४…..५९७४०..-१०५९६
माहीम…………५५४९८…..६९४८८.. -१३९९०
हेही पहा –
Join Our WhatsApp Community