Shiv Sena UBT : शिवाजी महाराज, बाळासाहेब, हिंदुत्व, सावरकर, मराठी माणूस ‘वचननाम्या’तून गायब

बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेतील शिवसैनिकांचा सहभाग वाढवला तर उद्धव ठाकरे यांनी सत्ता आणि सत्तेतील महत्वाची पदे यावर आपल्याच कुटुंबातील आणि आपल्या निकटवर्तीयांची वर्णी लावून शिवसैनिकांना दूर सारण्याचा प्रयत्न केला, असे पावसकर म्हणाले.

502
Shiv Sena UBT : शिवाजी महाराज, बाळासाहेब, हिंदुत्व, सावरकर, मराठी माणूस ‘वचननाम्या’तून गायब

महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाच्या जाहीरनाम्यात छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर, मराठी माणूस या शब्दांना स्थान नसल्याबद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आळवला जात असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या जाहीरनाम्याला ‘मम्’ म्हणत आपला सहभाग नोंदवला गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. (Shiv Sena UBT)

गांधींना दाखवूनच वचननामा प्रसिद्ध

शिवसेना (शिंदे) प्रवक्ते किरण पावसकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना, “उबाठाचा हा वचननामा प्रसिद्ध करण्यापूर्वी काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दाखवून परवानगीनंतरच प्रसिद्ध केला असावा. या वचननाम्यात छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर, मराठी माणूस हे गायब झाले आहेत,” असे ते म्हणाले. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – Delhi Mayor Election : दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक रद्द, पीठासीन अधिकारी नाही)

वडिलांच्या बांधिलकीबद्दल शंका

“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा, तत्व आणि त्यांचे योगदान पूर्णपणे संपुष्टात आणण्यात आले आहे. यामुळे उबाठा नेत्याची आपल्या वाडिलांच्या वारसाप्रति असलेल्या बांधीलकीबद्दल आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांबद्दल किती प्रामाणिक राहतील याबाबत शंका आहे,” असे सांगून पावसकर म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी इंडी आघाडीकडून फेटाळण्यात आली असावी त्यामुळे या मागणीचा समावेश वचननाम्यातून वगळण्यात आला असावा. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा साधा उल्लेखही न केल्याने कॉँग्रेससोबत गेल्यापासून सावरकर यांच्याप्रती असलेल्या भावना बोथट झाल्याचे दिसून येते आहे,” असा आरोप पावसकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. (Shiv Sena UBT)

सत्तेचा वाटा कुटुंबात

बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेतील शिवसैनिकांचा सहभाग वाढवला तर उद्धव ठाकरे यांनी सत्ता आणि सत्तेतील महत्वाची पदे यावर आपल्याच कुटुंबातील आणि आपल्या निकटवर्तीयांची वर्णी लावून शिवसैनिकांना दूर सारण्याचा प्रयत्न केला, असे पावसकर म्हणाले. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.