Sanjay Raut यांचे त-त-प-प झाले!

155
Sanjay Raut यांचे त-त-प-प झाले!
  • खास प्रतिनिधी 

जगातल्या कोणत्या ही विषयावर भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध आणि ‘विश्वप्रवक्ते’ म्हणून ख्याती असलेले शिवसेना ऊबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रसार माध्यमांसमोर त-त-प-प झाली.

मंगळवारी २८ जानेवारी २०२५ या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे संजय राऊत (Sanjay Raut) यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी राऊत यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली आणि उबाठा गटाची भूमिका आणि मते मांडली. त्यात त्यांनी सर्वोच्च न्यायालय भाजपाच्या दबावाखाली काम करते, असा आरोपही करायला ते विसरले नाहीत. तसेच राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरही राऊत यांनी विश्लेषण केले.

(हेही वाचा – Hawkers Action : जे बोरिवलीकरांना जमले ते दादरकरांना कधी जमणार?)

२,१०० रुपये द्यावे लागणार

महायुतीने ‘लाडक्या बहिणी’साठी सुरू केलेल्या योजनेमुळे राज्यावर ४५ हजार कोटींचा बोजा आहे, तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीची योजना अंमलात आणण्यासाठी आणखी आर्थिक बोजा पडणार असल्याचे राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केले. यानंतर ‘लाडक्या बहिणी’ला आता २,१०० रुपये महिना द्यावे लागणार आणि त्यासाठी पैसे कुठून आणणार? असा सवालही त्यांनी केला.

दमानिया यांचाही भाजपा संबंध

त्यानंतर बीड प्रकरणावर त्यांनी आपली भूमिका मांडली. “अंजली दमानिया यांचाही भाजपाचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फारतर. त्यामुळे निर्णय काय होईल यात पडू नका. वाल्मिक कराड काही दिवसांनी राजकारणात येतील आणि भाजपाच्याच गटामध्ये बसले असतील,” असेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यातील वादावर संजय राऊत यांनी विधान केले. तसेच “या गँगवॉरमध्ये रक्तपात होईल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी वेळीच लक्ष घातले पाहिजे,” असेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

(हेही वाचा – Gujarat मधील पाक सीमेजवळील गावात हिंदूंची लोकसंख्या घटली; अहवालानुसार, जमिनींवर मुस्लिमानांचा कब्जा)

सरकारच्या दबावाखाली

“आमदार अपात्रेसंदर्भात निर्णय येईल अशी अपेक्षा होती. संविधान आणि घटनेनुसार न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. आमदार ज्यांनी पक्षांतर केलं आहे ते अपात्र ठरतील. बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्ट दणका देईल. पण न्यायाच्या बाबतीत या अपेक्षा ठेवता येत नाहीत. आजच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी सांगितले आहे की, या देशाचे सुप्रीम कोर्ट असेल किंवा हाय कोर्ट असेल हे सरकारच्या दबावाखाली आहे,” असे राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

परब यांच्याबाबत त-त-प-प

अशा विविध विषयांवर रोखठोक मते मांडणाऱ्या राऊत (Sanjay Raut) यांना उबाठा नेते अनिल परब यांचे बाबा सिद्दीकी यांच्याशी त्यांच्यावर हल्ला झाला त्या दिवशी संवाद झाला होता, अशी माहिती बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव झिशान यांनी पोलिसांना दिल्याचे विचारले असता राऊत यांचे त-त-प-प झाले. “मला याबाबत काही माहिती नाही. माहिती घ्यावी लागेल,” असे सांगून राऊत यांनी वेळ मारून नेली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.