मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्यनेता असलेली शिवसेना आणि उबाठा यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरु असतानाच मुंबईत शिवसेनेच्या वाटचालीत उबाठाच अडथळा निर्माण करत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. राज्यात शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सरकार असल्याने शिवसेनेचे वर्चस्व मुंबईत वाढले गेले तर आपले काही खरे नाही त्यामुळे उबाठाचे धाबे दणाणले असून त्यामुळेच उबाठाचे नेते आणि पदाधिकारी हे शिवसेनेची बांधणी मुंबईत मजबूत होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे शिवसेनेचे प्राबल्य वाढले जाऊ नये यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी नेमले जावून त्यांची बांधणी होऊ नये यासाठी ते प्रयत्न करत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. (Shiv Sena-UBT)
(हेही वाचा – Haryana School: हरियाणातील शाळांमध्ये आता ‘Good Morning’ ऐवजी म्हणावे लागेल…)
शिवसेना आणि उबाठा यांच्यात न्यायालयीन लढाई सुरु असली तरी जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना कुणाची यावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न सुरु आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला संपण्याची भाषा केल्यानंतरही मुंबईत शिवसेनेचा एक खासदार आणि राज्यात शिवसेनेचे ०८ आणि उबाठाचे ०९ खासदार निवडून आले. त्यामुळे शिवसेनेचे राज्यातील प्राबल्य कायम असून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आमचा एक खासदार कमी असला तरी आमचा स्ट्राईक रन रेट अधिक असल्याचे सांगितले. मतांची टक्केचारी उबाठापेक्षा अधिक आहे. तसेच ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली, परंतु त्यांचे पुत्र हे महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षासोबत असून त्यांना मुस्लिमांनी निवडून दिले आहे. त्यामुळे खरी शिवसेना ही आमची असून उबाठा ही नकली शिवसेना असून त्यांना निवडून येण्यासाठी मुस्लिम मतांची आवश्यकता भासली आहे, असे बोलले जात आहे. (Shiv Sena-UBT)
(हेही वाचा – Israel ने हमासच्या 100 दहशतवाद्यांना उडवले; शाळेत सुरु होते कमांड सेंटर)
मात्र, मुंबईमध्ये उबाठाचे वर्चस्व असले तरी शिवसेनेच्या वाढत्या प्रस्थामुळे त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बिथरले आहेत. त्यामुळे मुंबईत शिवसेना पक्ष मजबूत उभा राहू नये, त्यांची भक्कम बांधणी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे कुणी पदाधिकारी पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यास किंवा त्यांच्यासोबत गेल्यास उबाठाचे पदाधिकारी त्यांच्यावर बहिष्कार घालतात, बोलत नाहीत तसेच त्यांचे ब्रेन वॉश करत त्याने शिवसेनेत जाऊ नये यासाठी प्रयत्न करतात. परिणामी शिवसेनेत सध्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मिळत नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, उबाठातून बरेच कार्यकर्ते व पदाधिकारी हे शिवसेनेत येत असले तरी ते आमच्या सोबत आले की लगेच उबाठाची माणसे त्याला भेटून त्यांचे ब्रेन वॉश करतात तसेच त्यांच्याशी बोलणे बंद करतात, त्याला त्रास देतात. त्यामुळे मग शिवसेनेत प्रत्यक्ष पुढे येऊन काम करायला तयार होत नसल्याचे शिवसेनेच्या नेत्यांचे व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Shiv Sena-UBT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community