Delhi निकालानंतर Shiv Sena UBT चे धाबे दणाणले; आघाडीसाठी लांगूलचालन!

108
Delhi निकालानंतर Shiv Sena UBT चे धाबे दणाणले; आघाडीसाठी लांगूलचालन!
  • खास प्रतिनिधी 

मुंबई महापालिकेसाठी स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) आता धाबे दणाणले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी धडपड आणि लाळघोटेपणा सुरू केला असल्याचे दिसून येत आहे.

अस्तित्वाची शेवटची संधी : मुंबई महापालिका

काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) प्रवक्ते संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिला होता. मुंबईमध्ये स्वबळावर महापालिका निवडणूक लढण्याची भाषा राऊत यांनी केली होती. शनिवारी ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभेचा निकाल लागला आणि शिवसेना उबाठा जमिनीवर आला. आता उबाठाला अस्तित्व टिकवण्याची शेवटची एक संधी म्हणजे मुंबई महापालिका. मुंबईसह अन्य महापालिकेत उबाठाचे नगरसेवक निवडून येतील तीच ताकद घेऊन पुढे पाच वर्षे काढावी लागणार आहेत.

(हेही वाचा – CM Fadnavis Raj Thackeray Meet : भाजपा-मनसे एकत्र येणार; राजकीय समीकरणे बदलणार ?)

राहुल गांधींची तळी उचलली

त्यामुळे शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) आता काँग्रेसचे लांगूलचालन सुरू केल्याचे सोमवारी १० फेब्रुवारी २०२५ च्या ‘सामाना’तील अग्रलेखातून दिसून येते. ‘काँग्रेस पक्षात अशा काही सुप्त शक्ती आहेत काय, ज्यांना राहुल गांधींच्या प्रतिष्ठेला नेहमीच तडे द्यायचे आहेत?’ असे म्हणत उबाठाने राहुल गांधी यांची तळी उचलून धरली.

राज्यातील काँग्रेस नेत्यांवर राग

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मुंबईतील एका बैठकीत महापालिका निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्या, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून झाली आणि राज्यातील काही काँग्रेस नेत्यांचे तेच मत आहे. त्यामुळे शिवसेना उबाठाचा (Shiv Sena UBT) राज्यातील काँग्रेस नेत्यांवर राग असून त्यांच्यावर टीका केली.

(हेही वाचा – Champions Trophy : पाकची पुन्हा नाचक्की, गद्दाफी स्टेडिअममधील सदोष फ्लडलाईट्समुळे रचिल रवींद्रला दुखापत)

उपहासात्मक टीका

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या संदर्भयाने अग्रलेखात म्हटले आहे की, “महाराष्ट्रातही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शेवटपर्यंत ताणाताणी केली व एक प्रकारे शेवटपर्यंत गोंधळाचे चित्र निर्माण झाले. दिल्लीत आप व काँग्रेस दोघेही एकमेकांना संपवायलाच लढले. त्यात मोदी-शहांचे फावले,” असे म्हणत “हे असेच चालणार असेल तर आघाड्या वगैरे निर्माण करायच्याच कशाला? मनसोक्त भांडा! महाराष्ट्रानंतर दिल्लीच्या निकालाने कोणी बोध घेणार नसतील तर हुकूमशहाच्या विजयाला हातभार लावण्याचे पुण्य पदरी पाडून घ्या व त्यासाठी गंगास्नानाचीही गरज पडणार नाही!” अशी उपहासात्मक टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.