- खास प्रतिनिधी
शिवसेना उबाठा नेत्यांना पक्ष फुटीची भीती वाटू लागल्याने त्यांनी उलट कांगावा करत शिवसेना (शिंदे) पक्षात भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत फूट पडावी अशी सुप्त इच्छा बाळगणाऱ्या उबाठा नेते संजय राऊत यांनी ‘महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे आणि तो शिंदे गटातीलच असेल,” असे विधान केले. (Shiv Sena UBT)
तिसऱ्या उपमुख्यमंत्र्याचा दावा
संजय राऊत शुक्रवारी २४ जानेवारी २०२५ या दिवशी पत्रकारांशी बोलताना उसने अवसान आणत म्हणाले, “महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे. तो शिंदे गटातीलच असेल. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पदाचा आणि पक्षाचा विचार करावा. ते काल मुख्यमंत्री होते, आज उपमुख्यमंत्री आहेत, पण उद्या कदाचित तेही राहणार नाहीत. हे सगळं पडद्यामागे सुरू आहे,” असेही ते म्हणाले. (Shiv Sena UBT)
(हेही वाचा – राज्यात चाललंय तरी काय? गेल्या तीन महिन्यांत १०८५ कोटींचा Cyber fraud)
शिंदे हे बाळासाहेबांचे विचार विसरले
राऊत यांनी शिंदेंच्या नेतृत्वावर कठोर शब्दांत टीका करत म्हटले, “मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना जपणारा आहे. पण आजचे राज्यकर्ते महाराष्ट्राच्या अध:पतनाला जबाबदार आहेत. बाळासाहेबांनी कधीच लाचारी पत्करायला शिकवलं नाही. मात्र शिंदे गट सध्या बाळासाहेबांच्या विचारांवर थुंकण्याचे काम करत आहे. हेच मोदी आणि अमित शाह यांना हवे आहे. त्यांनी शिवसेनेची फोड करून एक समांतर शिवसेना उभी केली आहे, पण ती टिकणार नाही.” (Shiv Sena UBT)
शिंदे गटाला ‘जयचंद’ म्हणत प्रहार
राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर थेट आरोप करत म्हटले, “एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुखांचे वारसदार नाहीत. ते ईडी आणि सीबीआयच्या भीतीने पळून गेलेले जयचंद आहेत. ज्यांनी आपली कातडी वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या शत्रूंना मदत केली आहे, ते महाराष्ट्राला माहीत आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार आणि लाचारीचा नवा अध्याय सुरू आहे. शिवसेनेच्या नावाने हे पैशाच्या जोरावर राजकारण करत आहेत, आणि बाळासाहेब ठाकरे अशा राजकारणाला ‘वेश्येचं राजकारण’ म्हणत असत,” अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली. (Shiv Sena UBT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community