- खास प्रतिनिधी
मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडून (Congress) शिवसेना उबाठाला विरोध होत असल्याने शिवसेना उबाठाकडून जागावाटपात काँग्रेसचे जास्तीतजास्त नुकसान करण्याचे ‘पद्धतशीर नियोजन’ होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
‘मविआ’चा वाद दिल्ली दरबारी
एकीकडे महायुतीकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध होत असताना महाविकास आघाडीत मात्र अद्याप जागावाटापावरुन प्रचंड रस्सीखेच पहायला मिळत आहे. जागावाटापाचा वाद दिल्ली दरबारी गेला असून अद्याप तोडगा निघू शकला नाही.
(हेही वाचा – न्यायाधिशांच्या निवृत्तीनंतरच्या राजकीय सक्रियतेवर Justice Gavai यांची नाराजी)
विदर्भात काँग्रेसची ताकद कमी करण्याचा प्रयत्न
महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress) पक्ष हा विदर्भात शिवसेना उबाठा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा तुलनेत वरचढ असल्याने काँग्रेसला या भागात कमी जागा देऊन काँग्रेसची ताकद म्हणजेच निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी नियोजन होत आहे. विदर्भात काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी करण्याबरोबरच मुंबईतही भाजपाचे गड असलेल्या जागा काँग्रेसच्या (Congress) वाट्याला देऊन मुंबईतही काँग्रेसला नुकसान कसे होईल, यासाठी शिवसेना उबाठा प्रयत्नशील असल्याचे समजते.
.. तर काँग्रेसचा मुख्यमंत्री नाही
यामुळे शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्यापेक्षा काँग्रेसचे (Congress) आमदार कमी निवडून येतील आणि सत्ता आल्यास काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार नाही, अशी रणनीती महाविकास आघाडीतील दोन्ही प्रादेशिक पक्षांनी आखल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
(हेही वाचा – Gadchiroli मध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक; तीन ते चार माओवादी ठार! धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ)
वादामागे शरद पवार?
शिवसेना उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरूनही काँग्रेसने (Congress) त्याला सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने उबाठाकडून जागावाटापाचा वाद चिघळवला जात असल्याचे दिसून येते. तर या सर्व घडामोडींमागे राज्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत का? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री
मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडून (Congress) उबाठाला सकारात्मक प्रतिसाद दिला जात नाही तर ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, अशी भूमिका काँग्रेसने घेतली असल्याने उबाठाने आता काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी करण्यावर लक्ष्य केंद्रित केल्याची चर्चा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community