पक्षनिष्ठा सिद्ध करण्यासाठी Shiv Sena UBT च्या कार्यकर्त्यांची दर्ग्यात शपथ; राणे म्हणाले, मंदिर दिसले नाही का?…

469
पक्षनिष्ठा सिद्ध करण्यासाठी Shiv Sena UBT च्या कार्यकर्त्यांची दर्ग्यात शपथ; राणे म्हणाले, मंदिर दिसले नाही का?...
पक्षनिष्ठा सिद्ध करण्यासाठी Shiv Sena UBT च्या कार्यकर्त्यांची दर्ग्यात शपथ; राणे म्हणाले, मंदिर दिसले नाही का?...

शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दि. ८ डिसेंबर रोजी एका दर्ग्यात जात पक्षनिष्ठा सिद्ध करण्यासाठी शपथ घेतली. हा दर्गा रत्नागिरी जिल्ह्यातील हातीसमध्ये असून त्याचे नाव पीर बाबर शेख दर्गा (Pir Babar Sheikh Dargah) असे आहे. मुळात विधानसभा निवडणुकीत कोकणात महायुतीच्या उमेदवारानी बाजी मारली. तर महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा पक्षाला कोकणात जोरदार धक्का बसला. रत्नागिरी, राजापूर या मतदारसंघात उबाठाचे उमेदवार पराभूत झाले. त्यानंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. ज्यानंतर पक्षावरील पक्षनिष्ठा सिद्ध करण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट दर्गा गाठला. ज्यामुळे सोशल मीडियावर शिवसेना उबाठाच्या (Shiv Sena UBT) बदलेल्या विचारधारेमुळे टीका होऊ लागली आहे. (Shiv Sena UBT)

( हेही वाचा : ईव्हीएमवर शंका असल्यास खासदारांनी राजीनामा द्यावा; Navneet Rana यांचा विरोधकांवर निशाणा

कोकणात शपथ घेण्याला फार महत्त्व असते. एखाद्या देवस्थानात, ग्रामदेवतेकडे किंवा जागृत देवस्थानात शपथ घेतली जाते. त्यातच ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी थेट पीर बाबर शेख दर्ग्यात (Pir Babar Sheikh Dargah) जाऊन पक्षनिष्ठेची शपथ घेतली. यावेळी आपण चुकीचं काम केलं नाही. पक्षाचा विश्वासघात केला नाही, असा दावा ही कार्यकर्त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीतील आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठाच्या (Shiv Sena UBT) विनायक राऊत यांच्या पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी विनायक राऊतांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.पण आरोप- प्रत्यारोप करण्यापेक्षा देवासमोर शपथ घेण्याचे ठरले. ज्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी चक्क पीर बाबर शेख दर्गा (Pir Babar Sheikh Dargah) गाठला. मात्र यावेळी जिल्हाप्रमुख आणि सहजिल्हाप्रमुख गैरहजर असल्याची माहिती आहे. (Shiv Sena UBT)

याप्रकरणात बहुतांश कार्यकर्ते, पदाधिकारी तालुका कार्यकारणीतील होते. मात्र शिवसेना उबाठाच्या (Shiv Sena UBT) कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे शिवसेना उबाठाचा (Shiv Sena UBT) हिंदुत्ववादी बुरखा फाटला आहे. उबाठाच्या कार्यकर्त्यांनी निष्ठेची शपथ घ्यायला मंदिर का दिसले नाही? असा सवाल करत शिवसेनेचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरे (Shiv Sena UBT) गटावर निशाणा साधला.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.