मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला वाच्या फोडण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी येत्या १ जुलैला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महापालिकेवरती विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मंगळवारी, २० जूनला झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आज बऱ्याच दिवसांनंतर मुंबईचे जे आमचे नगरसेवक आहेत, त्या नगरसेवकांची बैठक घेतली. कारण मधे-मधे काही कुणकुण कानावर येत असते, कशी काम तिकडे चालली आहेत. एक वर्ष जवळपास होऊन गेलं, महापालिका आता विसर्जित झाली आहे. त्याच्यानंतर निवडणुका आज होतील, उद्या होतील, परवा होतील, पावसाप्रमाणेसुद्धा निवडणुका लांबत चालल्या आहेत. निवडणूक घेण्याची हिंमत जे आताच सरकार ज्याचं वर्णन बेकायदेशीर करतात, ते काही घेत नाहीयेत. लोकांची काम आणि लोकांची सेवा कशी करायची हा एक प्रश्न पडला आहे. पैसा उधळला जातोय, खर्च केला जातोय, त्याला जाब विचारणारं कोणीच नाहीये. ज्यावेळेला महापालिकेमध्ये जनतेचे प्रतिनिधी असतात, तेव्हा तिथे प्रशासन प्रस्ताव पाठवतं असतं, स्थायी समितीमध्ये सर्व पक्षीय प्रतिनिधी असतात, त्यांच्यावरती त्यावर चर्चा होते. मंजूरी नामंजूरी होते. आणि मग हे काँट्रॅक्ट दिलं जातं. आता आपण पाहतो आहोत, वारे-माप उधळलं पट्टी चालली आहे, मग ती रस्त्याच्या नावाने असेल, जी-२०च्या नावाने असेल, आणखीन कशाची असेल, मुंबईला माय-बापचं कोणी राहिलं नाहीये. सगळं काही आहे, ते लुटालुटचं चालू आहे. हा महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाच्या फोडण्यासाठी जाब विचारण्यासाठी येत्या १ जुलैला शिवसेना महापालिकेवरती विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाच नेतृत्व शिवसेना नेते करतीलच, आदित्य करेलच.’
(हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर रवाना: देशाची प्रतिष्ठा वाढणार; न्यूयॉर्कमध्ये योगा करणार)
‘लोकांच्या मनात जी खदखद आहे, कारण तुम्हाला सर्वांना माहितेय की, एक काळ असा होता की मुंबई महापालिका जवळपास साडे सहाशे कोटी तुटी मध्ये होती. त्याच्यानंतर शिवसेनेने ज्यावेळेस कारभार सांभाळला, तेव्हा पासून ते आतापर्यंत ९२ हजार कोटी केव्हीपर्यंत महापालिकेची तिजोरी आमच्या कारभाराने म्हणा किंवा सहकार्याने म्हणा त्याच्यात भर पडली. हे सगळे पैसे महापालिकेचे होते असे नाही, त्याच्यामध्ये ठेवी होत्या, आणि या ठेवींमधून मग तो कोस्टल रोड असेल किंवा आणखी काही असेल जनतेच्या उपयोगाची काम आणि योजना महापालिका पार पाडतं होती. आता मात्र कोणतंही काम असेल तर बेधडक पणाने महापालिकेचा पैसा वापरला जात आहे. माझ्या कानावर असं आलं, जवळपास आतापर्यंत सात ते आठ, नऊ हजार कोटी रुपये त्या एफडीमधून वापरण्यात आले आहेत. हा जनतेचा पैसा आहे, आणि या जनतेच्या पैशाची लूट याचा हिशोब हा जनतेला त्यांना द्यावाचं लागेल. तो हिशोब आणि त्याचा जाब विचारण्यासाठी येत्या १ जुलैला मुंबई महापालिकेवरती शिवसेना विराट मोर्चा काढणार आहे. आणि मला माहितेय, तेव्हा आयुक्त असतील नसतील, शेवटी मुंबईकरांच्या मनातील असंतोषाचं प्रतिक आहे, त्याला वाच्या फोडणार आहे, ते आम्ही करणार आहोत,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community