- खास प्रतिनिधी
राज्यात गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेत उभी फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांचे ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षातून बाहेर पडले. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडी, निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षांकडील सुनावणी यातून शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे यांना देण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांनी ७ जागांवर विजय मिळवला तर उद्धव ठाकरे यांनी ९ जागा राखण्यात यश मिळवले. (Shiv Sena)
फोकस मुंबईवर
आता विधानसभेला ५१ जागांवर शिंदे विरुद्ध ठाकरे उमेदवार भिडत असून या लढाईत कोण वरचढ ठरतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ठाकरे यांचा जीव मुंबई आणि कोकणात अडकला असल्याने त्यांचा ‘फोकस’ हा या विभागावर अधिक आहे.
(हेही वाचा – निवडणुक कालावधीत दगडफेक झाली तर जबाबदारी पोलिसांची; Jitendra Awhad यांची धमकी)
मुंबईतील लढत
मुंबईत वरळी मतदारसंघात शिवसेना उबाठाच्या आदित्य ठाकरे यांच्यासमोर शिवसेना शिंदे यांनी खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे, तर माहीममध्ये शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्यासमोर उबाठाने विभाग प्रमुख महेश सावंत यांना उतरवले आहे. चेंबूर मतदारसंघात शिवसेनेचे तुकाराम काते विरुद्ध उबाठाचे प्रकाश फातर्फेकर, भायखळा मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव विरुद्ध उबाठाचे मनोज जामसुतकर निवडणूक रिंगणात आहेत.
कोकणात कोण?
कोकणात लोकसभा निवडणुकीत उबाठाचा पुरता पराभव झाल्यानंतर आता विधानसभेत उबाठाने प्रयत्न सुरू केले आहेत. कुडाळमधील उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे शिवसेनेकडून (शिंदे) निवडणुकीला उभे आहेत. तर, रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत आणि त्यांचे भाऊ किरण सामंत हे रत्नागिरी आणि राजापूर मतदारसंघातून उबाठाचे अनुक्रमे बाळ माने आणि राजन साळवी यांच्याविरोधात निवडणुकीला उतरले आहेत. तर, सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर यांच्याविरोधात शिवसेना उबाठा गटाकडून राजन तेली निवडणूक लढविणार आहेत. (Shiv Sena)
(हेही वाचा – Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा किती पक्ष रिंगणात? )
मराठवाडा-उत्तर महाराष्ट्र
मराठवाड्यातही शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत होताना दिसत आहे. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, तानाजी सावंत व संतोष बांगर यांच्याविरोधात या ठिकाणी उबाठा गटाचे उमेदवार उभे आहेत तर विदर्भातही मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात उबाठा गटाचे पवन जैस्वाल मैदानात आहेत.
उत्तर महाराष्ट्रात पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्यासमोर उबाठा गटाच्या वैशाली सूर्यवंशी लढत आहेत. मालेगाव येथे मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात अद्वय हिरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Shiv Sena)
(हेही वाचा – Dombivliतील उबाठा गटाचे उपनेते सदानंद थरवळ यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश)
ठाकरे विरुद्ध शिंदे, मतदारसंघ आणि उमेदवार?
चोपडा – राजू तडवी (शिवसेना उबाठा गट) विरुद्ध चंद्रकांत सोनावणे (शिवसेना शिंदे गट)
पाचोरा – वैळाली सूर्यवंशी (उबाठा गट) विरुद्ध किशोर पाटील (शिंदे गट)
बुलढाणा – जयश्री शेळके (उबाठा गट) विरुद्ध संजय गायकवाड (शिंदे गट
मेहकर – सिद्धार्थ खरात (उबाठा गट) विरुद्ध डॉ. संजय रायमुलकर (शिंदे गट)
बाळापूर – नितीन देशमुख (उबाठा गट) विरुद्ध बळीराम शिरसकर (शिंदे गट)
दर्यापूर – गजानन लवटे (शिवसेना उबाठा गट) विरुद्ध अभिजीत अडसूळ (शिंदे गट)
रामटेक – बिशाल बरबटे (उबाठा गट) विरुद्ध आशिष जैस्वाल (शिंदे गट)
कळमनूरी – संतोष टारफे (उबाठा गट) विरुद्ध संतोष बांगर
परभणी – डॉ. राहुल पाटील (उबाठा गट) विरुद्ध आनंद भरोसे (शिंदे गट)
सिल्लोड – सुरेश बनकर (उबाठा गट) विरुद्ध अब्दुल सत्तार (शिंदे गट)
कन्नड – उदयसिंग राजपूत (उबाठा गट) विरुद्ध संजना जाधव (शिंदे गट)
औरंगाबाद मध्य – बाळासाहेब थोरात (उबाठा गट) विरुद्ध प्रदीप जैस्वाल (शिंदे गट)
औरंगाबाद पश्चिम – राजू शिंदे (उबाठा गट) विरुद्ध संजय शिरसाट (शिंदे गट)
पैठण – दत्ता गोर्डे (उबाठा गट) विरुद्ध विलास भुमरे (शिंदे गट)
वैजापूर – दिनेश परदेशी (उबाठा गट) विरुद्ध रमेश बोरनारे (शिंदे गट)
नांदगाव – गणेश धात्रक (उबाठा गट) विरुद्ध सुहास कांदे (शिंदे गट)
मालेगाव बाह्य – अद्वय हिरे (उबाठा गट) विरुद्ध दादा भुसे (शिंदे गट)
पालघर – जयेंद्र दुबळा (उबाठा गट) विरुद्ध राजेंद्र गावीत (शिंदे गट)
बोईसर – डॉ. विश्वास वळवी (उबाठा गट) विरुद्ध विलास तरे (शिंदे गट)
भिवंडी ग्रामीण – महादेव घाटाळ (उबाठा गट) विरुद्ध शांताराम मोरे (शिंदे गट)
कल्याण पश्चिम – सचिन बासरे (उबाठा गट) विरुद्ध विश्वनाथ भोईर (शिंदे गट)
अंबरनाथ – राजेश वानखेडे (उबाठा गट) विरुद्ध बालाजी किणीकर (शिंदे गट)
कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर (उबाठा गट) विरुद्ध राजेश मोरे (शिंदे गट) विरुद्ध मनसेचे उमेदवार राजू पाटील
ओवळा माजीवाडा – नरेश मनेरा (उबाठा गट) विरुद्ध प्रताप सरनाईक (शिंदे गट)
कोपरी पाचपाखडी – केदार दिघे (उबाठा गट) विरुद्ध एकनाथ शिंदे (शिंदे गट)
मागाठाणे – उदेश पाटेकर (उबाठा गट) विरुद्ध प्रकाश सुर्वे (शिंदे गट)
विक्रोळी – सुनील राऊत (उबाठा गट) विरुद्ध सुवर्णा करंजे (शिंदे गट)
भांडुप पश्चिम – रमेश कोरगावकर (उबाठा गट) विरुद्ध अशोक पाटील (शिंदे गट)
जोगेश्वरी पूर्वी – अनंत (बाळा) नर (उबाठा गट) विरुद्ध मनीषा वायकर (शिंदे गट)
दिंडोशी – सुनील प्रभू (उबाठा गट) विरुद्ध संजय निरुपम (शिंदे गट)
अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके (उबाठा गट) विरुद्ध मुरजी पटेल (शिंदे गट)
चेंबूर – प्रकाश फातर्पेकर (उबाठा गट) विरुद्ध तुकाराम काते (शिंदे गट)
कुर्ला – प्रविणा मोरजकर (उबाठा गट) विरुद्ध मंगेश कुडाळकर (शिंदे गट)
माहीम – महेश सावंत (उबाठा गट) विरुद्ध सदा सरवणकर (शिंदे गट)
वरळी – आदित्य ठाकरे (उबाठा) विरुद्ध मिलिंद देवरा (शिंदे गट)
भायखळा – मनोज जामसुतकर (उबाठा गट) विरुद्ध यामिनी जाधव (शिंदे गट)
कर्जत – नितीन सावंत (उबाठा गट) विरुद्ध महेंद्र थोरवे (शिंदे गट)
महाड – स्नेहल जगताप (उबाठा गट) विरुद्ध भरत गोगावले (शिंदे गट)
नेवासा – शंकरराव गडाख (उबाठा गट) विरुद्ध विठ्ठलराव लंघे पाटील (शिंदे गट)
उमरगा – प्रवीण स्वामी (उबाठा गट) ज्ञानराज चौगुले (शिंदे गट)
उस्मानाबाद – कैलास पाटील (उबाठा गट) विरुद्ध अजित पिंगळे (शिंदे गट)
बार्शी – दिलीप सोपल (उबाठा गट) विरुद्ध राजेंद्र राऊत (शिंदे गट)
सांगोला – दीपक आबा साळुंखे (उबाठा गट) विरुद्ध शहाजीबापू पाटील (शिंदे गट)
पाटण – हर्षद कदम (उबाठा गट) विरुद्ध शंभूराज देसाई (शिंदे गट)
दापोली – संजय कदम (उबाठा गट) योगेश कदम (शिंदे गट)
गुहागर – भास्कर जाधव (उबाठा गट) विरुद्ध राजेश बेंडल (शिंदे गट)
रत्नागिरी – बाळ माने (उबाठा गट) विरुद्ध उदय सामंत (शिंदे गट)
राजापूर – राजन साळवी (उबाठा गट) विरुद्ध किरण सामंत (शिंदे गट)
कुडाळ – वैभव नाईक (उबाठा गट) विरुद्ध निलेश राणे (शिंदे गट)
सावंतवाडी – राजेश तेली (उबाठा गट) विरुद्ध दीपक केसरकर (शिंदे गट)
राधानगरी – के. पी. पाटील (उबाठा गट) विरुद्ध प्रकाश आबिटकर (शिंदे गट)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community