देशात पहिल्यांदा हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं निवडणूक लढवली. त्यावेळी बाळासाहेबांनी हिंदुत्त्वाचा खुला प्रचार केला होता. भाजपमधील आजचे नवे नेते, नवहिंदुत्त्ववादी असून त्यांच्या इतिहासाची काही पानं कोणीतरी फाडून टाकलीत. पण, जर त्यांची इच्छा असेल, तर आम्ही वेळोवेळी त्यांना माहिती देत राहू, असा टोला शिवसेनेते खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
काय म्हणाले राऊत
फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी देशात पहिल्यांदा हिंदुत्त्वाचा खुला प्रचार केला होता. तुम्ही पाहू शकता, व्हिडीओ अजूनही युट्यूबवर आहे. बाळासाहेबांनी खुला प्रचार केला होता. विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत, या निवडणुकीत आमच्याविरोधात काँग्रेसही होती आणि भाजपही होती. आमचे रमेश प्रभू लढले होते. त्यानंतर सर्वांना झटका लागला की, बाळासाहेब ठाकरेंनी जो हिंदुत्त्वाचा मुद्दा उचलला आणि तो जनतेला भावला आहे.
…आणि युतीची चर्चा सुरू झाली
ते पुढे असेही म्हणाले, आता देशात हिंदुत्व वाढेल आणि या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवू शकतो. त्यानंतर युतीची चर्चा सुरु झाली. भाजपच्या मोठ्या नेत्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली. भाजप नेत्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की, आपण एकत्र निवडणूक लढवूयात. बाळासाहेबांनी या प्रस्तावाला संमती दर्शवली. ते म्हणाले की, आपण सगळे एकत्र निवडणूक लढवूयात. हिंदुत्वाच्या मतांचं विभाजन झालं नाही पाहिजे. त्यावेळी मोठे-मोठे नेते होते. अटलजी, अडवाणी आणि प्रमोदजी होते. त्यावेळी प्रमोद महाजन यांनी मोठी भूमिका होती.
(हेही वाचा –राज्यात सलग तिस-या दिवशीही गारठा कायम; केंद्रीय वेधशाळेने दिला इशारा)
राऊतांचा फडणवीसांना टोला
भाजप, शिवसेना युतीमध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची भूमिका महत्त्वापूर्ण होती. आजचे जे नवे नेते आहेत भाजपचे, नवहिंदुत्त्ववादी आहेत. त्यांच्या इतिहासाची काही पानं कोणीतरी फाडून टाकलीत. पण, हिंदुत्वाबद्दल जाणून घेण्याची त्यांची इच्छा असेल, तर त्यांना आम्ही वेळोवेळी माहिती देत राहू, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे
Join Our WhatsApp Community