मुंबई प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहेत. यासंदर्भात सोमवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या मुंबईतील खासदार, आमदार, नेते आणि उपनेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक (Shiv Sena Rangsharada meeting) पार पडली. या बैठकीत महापालिका निवडणुकीपूर्वी (BMC Elections) संघटना मजबुत करण्याचे निर्देश शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. (Dr. Shrikant Shinde)
मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर सोमवारी पक्षाच्या मुंबईतील आजी माजी आमदार, खासदार, नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार डॉ. शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी महापालिका निवडणुकीसंदर्भातील पक्षाच्या रणनितीबाबत चर्चा केली. पक्ष संघटना मजबूत करण्याचे निर्देश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
येत्या २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त वांद्रे कुर्ला संकुलात शिवसेनेचा भव्य मेळावा होणार आहे. यात पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते विजयी आमदार आणि खासदारांचा सत्कार केला जाईल, अशी माहिती शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी यावेळी दिली. पक्ष संघटनेत लवकरच फेरबदल केले जातील. तत्पूर्वी मुंबईत २४ जानेवारीपासून ९ फेब्रुवारीपर्यंत सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाईल. आतापर्यंत सगळ्यात मोठी सभासद नोंदणी असेल, असा विश्वास कदम यांनी यावेळी व्यक्त केला.
(हेही वाचा – मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी CM Devendra Fadnavis पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार)
शिवसेनेच्या विचारधारेला काळीमा फासण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. लाचारी करुन काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असा घणाघात रामदास कदम यांनी यावेळी केला. स्मारकाचा खर्च शासनाचा असून उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबाप्रमाणे अध्यक्षस्थानी बसले आहेत. त्यामुळे त्यांची स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन ताबडतोब हकालपट्टी व्हावी, ही आमची मागणी आहे. याबाबत सोमवारच्या बैठकीत ठराव घेण्यात आला असून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पाठवला जाईल, असे कदम यांनी सांगितले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community