नाशिकमध्ये युवासेनेचे Jitendra Awhad यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

213
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे चवदार तळ्याजवळ जाऊन मनुस्मृती जाळण्याचा स्टंट केला, त्याच वेळी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडले. याप्रकरणी राज्यभर संताप व्यक्त होऊ लागला आहे. शिवसेनेच्या युवासेनेने बुधवारी नाशिकमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले.
राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील 2 श्लोकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे राज्यात उलट सुलट पडसाद उमटत आहेत. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांनी बुधवारी महाड स्थित चवदार तळ्याच्या ठिकाणी सरकारच्या या निर्णयाविरोधात मनुस्मृतीचे दहन केले. पण यावेळी त्यांनी डॉ. आंबेडकर यांचाही फोटो फाडला. त्यांच्या या कृतीच्या विरोधात युवासेनेने नाशिकच्या मायको सर्कल येथे आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले. केवळ राजकीय स्वार्थासाठी आव्हाड यांनी हे आंदोलन केल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.