CM Eknath Shinde : जनतेत जा आणि त्यांच्या समस्या समजून घ्या; एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या नेत्यांना सूचना

शिवसेनेचा भरणार पाच दिवस जनता दरबार

158
CM Eknath Shinde : जनतेत जा आणि त्यांच्या समस्या समजून घ्या; एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या नेत्यांना सूचना
CM Eknath Shinde : जनतेत जा आणि त्यांच्या समस्या समजून घ्या; एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या नेत्यांना सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा जनता दरबार सोमवार ते शनिवार असा पाच दिवस सुरू होणार आहे. शिवसेनेचे दोन मंत्री बाळासाहेब भवनात जनता दरबारच्या माध्यमातून राज्यातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, प्रत्येक नागरिकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणार आहेत. (CM Eknath Shinde)

कोणत्या दिवशी कोण मंत्री असणार

राज्यातील जनतेचे प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसेनेने कार्यक्रम ठरविला आहे. राज्यभरातील जनतेच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ९ मंत्र्यांना आठवड्यातील शिवसेना बाळासाहेब भवन येथे जनता दरबार घेण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ९ मंत्र्यांची बैठक घेऊन असे आदेश दिले आहेत. प्रत्येक दिवशी म्हणजे सोमवारी दादा भुसे व उदय सामंत, मंगळवारी शंभूराजे देसाई व संदीपान भुमरे, बुधवारी दीपक केसरकर व तानाजी सावंत, गुरुवारी अब्दुल सत्तार व गुलाबराव पाटील आणि शुक्रवारी संजय राठोड शिवसेना बाळासाहेब भवनात जनता दरबार घेण्यात येणार आहे. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Hardik Pandya : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुढील सामन्याला मुकणार; ‘या’ खेळाडूला मिळणार संधी)

याबद्दल अधिक माहिती देताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शिवसेना बाळासाहेब भवनामध्ये आपले प्रश्न आपल्या समस्या घेऊन येणारे लोक मग ते कामगार, शेतमजूर, जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, कोणत्याही जातीधर्माचे असू देत त्यांच्या समस्यांचे निराकरण जनता दरबाराच्या माध्यमातून करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आम्हा ९ मंत्र्यांना दिलेले आहेत. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांची पद्धत होती. त्याच पद्धतीने काम करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कामाची सुरुवात केलेली आहे. (CM Eknath Shinde)

राज्यातील जनतेचा व राज्याच्या विकासाचा ध्यास असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अनेक लोक विधायक निर्णय घेतले. त्यामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मग तो गरीब असो व श्रीमंत प्रत्येक व्यक्तीला ५ लाख रुपये वैद्यकीय विम्याचे कवच देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मागच्या अडीच वर्षे सत्तेत असणाऱ्या सरकारने जनतेसाठी अडीच कोटी निधी दिला नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात १२५ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिलेला आहे, असे सत्तार म्हणाले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.