विरोधकांच्या ‘फेक नेरेटिव्ह’ ला Shiv Sena च्या रणरागिणी देणार प्रत्युत्तर

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत महिलांचा निर्धार

158
विरोधकांच्या 'फेक नेरेटिव्ह' ला Shiv Sena च्या रणरागिणी देणार प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शेतकरी, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी व वृद्धांसाठी केलेल्या विविध योजनांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी पक्षाच्या महिला पदाधिकारी सरसावल्या असून या योजनांच्या माध्यमातून विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. (Shiv Sena)

शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत डॉ. बोलत होत्या. बैठकीला मीना कांबळी, भावना गवळी, सचिव भाऊ चौधरी, सिद्धेश कदम उपस्थित होते. (Shiv Sena)

(हेही वाचा – Microsoft Outage: विमानतळांवर हाताने लिहिले बोर्डिंग पास; प्रवाशांना आठवले जुने दिवस)

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तीन टप्प्यात महिला पदाधिकाऱ्यांचा राज्यात दौरा होणार असून, प्रत्येक टप्प्यात जवळपास १०-११ जिल्हे असणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, आनंदाचा शिधा, लेक लाडकी योजना या सर्व योजना महाराष्ट्रात घरोघरी पोहचवण्याचा निर्धार यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी केला. (Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.