दरवर्षी शिवजयंती आग्रा किल्ल्यावरच साजरी करायची, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आग्रा किल्ल्यावर दिवाण-ए-आममध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरवर्षी शिवजयंती इथेच साजरी करणार असल्याचे म्हटले.
राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी जल्लोषात साजरी करण्यात आली. दोन वर्षांनी निर्बंधमुक्त शिवजयंती साजरी करण्यात येत असल्याने सगळीकडेच उत्साहाचे वातावरण होते. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विनोद पाटील यांच्या अंजिक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर आर पाटील फाऊंडेशनच्यावतीने आग्र्यातील लाल किल्ल्यावर शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवासाठी हजातो शिवप्रेमी जमले होते. या खास कार्यक्रमासाठी औरंगाबादहून कार्यकर्त्यांची स्पेशल ट्रेन रवाना झाली होती.
आग्रा येथील लाल किल्ल्यामध्ये मोठ्या उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती आज साजरी करण्यात आली. ही जयंती आग्र्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणे हा ऐतिहासिक क्षण असल्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde यावेळी म्हणाले.#शिवजयंती pic.twitter.com/Uoqktm3dTR
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 19, 2023
आग्रा किल्ल्यावरील जयंती सुवर्णाक्षरांत लिहिली जाईल- मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्या लाल किल्ल्यात औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना अपमानित करुन नजरकैदेत टाकले, ज्या दिवाण-ए-खासमध्ये शिवछत्रपतींना बोलावून त्यांचा अपमान केला, त्याच ठिकाणी शिवजयंतीचा हा सोहळा साजरा होणे हा माझ्या आयुष्यातील रोमांचकारी क्षण आहे. आज बदला घ्यायची संधी मिळाली. अनेक शिवभक्त या ठिकाणी आले आहेत. ही शिवजयंती सोनेरी अक्षरांत लिहिली जाईल.
Join Our WhatsApp Community