Shivadi Assembly : चौधरी, नांदगावकरांना शिवडीत टक्कर देणार शिवसेनेचा ‘हा’ उमेदवार, मंगळवारी भरणार उमेदवारी अर्ज

198
Shivadi Assembly : चौधरी, नांदगावकरांना शिवडीत टक्कर देणार शिवसेनेचा 'हा' उमेदवार, मंगळवारी भरणार उमेदवारी अर्ज
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

शिवडी विधानसभा क्षेत्रात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना उमेदवारी न देता उबाठा शिवसेनेने अजय चौधरी यांना उमेदवारी दिल्यामुळे आधीच नाराजीचा सूर असतानाच आता या मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने माजी नगरसेवक नाना आंबोलो हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. या मतदारसंघातून मनसेने बाळा नांदगावकर यांना यापूर्वीच उमेदवारी देण्यात आली आहे. नान आंबोले हे भाजपामध्ये असून त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना शिवडीची उमेदवारी देण्यात येत असून मंगळवारी नाना आंबोले हे आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. (Shivadi Assembly)

(हेही वाचा – शेतकऱ्यांची जमीन Waqf Board ची म्हणून जाहीर करणाऱ्या कर्नाटक सरकारचा यु टर्न)

शिवडी विधानसभेतून मनसेच्या वतीने आधीच बाळा नांदगावकर यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार अजय चौधरी यांच्या पत्ता कापून लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना उमेदवारी देण्याबाबत जोरदार रस्सीखेच होती. त्यातच ठाकरे यांनी, संकट काळात माझ्यासोबत आणि पक्षासोबत कायम राहिल्याने निष्ठेने राहिल्याने चौधरी यांची उमेदवारी जाहीर करण्यात येत असल्याचे घोषित केले. त्यानुसार अजय चौधरी यांनी सोमवारी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना अजय चौधरी यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत आणि सुधीर साळवी हे या रॅलीमध्ये सहभागी होते. सुधीर साळवी यांची समजूत काढून चौधरी यांना उमेदवारी देण्यात उद्धव ठाकरे हे यशस्वी ठरले तरीही या मतदारसंघातून शिवसेनेला आपला उमेदवार जाहीर करता आलेला नाही. (Shivadi Assembly)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : युगेंद्र पवार : ५० लाख उत्पन्न; पाच वर्षात ५० कोटी!)

आता शिवडी मतदारसंघातून भाजपाचे नाना आंबोले यांचे नाव चर्चेत आहे. नाना आंबोले यांनी भाजपातून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांची उमेदवारी वरिष्ठ पातळीवर निश्चित झाली आहे. त्यानुसार नाना आंबोले हे मंगळवारी करीरोड येथील रामदूत इमारतीतील निवडणूक कार्यालयात सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे संदेश पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाठवले जात आहे. नाना आंबोले हे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असून मागील सन २०१७ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत नाना आंबोले यांनी शिवसेना सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. परंतु महायुतीमध्ये ही जागा भाजपाच्या वाट्याला येत नसल्याने तसेच शिवसेनेकडून तेवढ्याच ताकदीचा उमेदवार नसल्यान आंबोले यांना शिवसेना पक्षात प्रवेश देऊन त्यंना उमेदवारी देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. (Shivadi Assembly)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.