लोकसभा निवडणुकीत शिरूरची जागा महायुतीत अजित पवार गटाला सुटली. त्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना (Shivajirao Adhalrao Patil) शिवसेनेतून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली. त्यात त्यांचा पराभव झाला. यावेळी महायुतीचे नेते मला फारसं काही विचारत नाहीत. असा नाराजीचा सुर त्यांच्यात दिसून आला. यातच जनसन्मान यात्रा राजगुरूनगरमध्ये आली होती तेव्हा देखील त्यांची अनुपस्थिती त्याच नाराजीचा कारण आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
(हेही वाचा – BJP : विधान परिषदेतील आरक्षण पाच टक्क्यांनी वाढविणार)
यातच अजित पवार यांना सांगून शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) वेगळ्या कामानिमित्त गेले आहेत अशीही चर्चा होती. अजित पवारांची जनसन्मान यात्रा खेड आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघात देखील झाली. त्यावेळी देखील शिवाजीराव आढळराव पाटील या कार्यक्रमांना उपस्थितीत राहणार का ? त्यांची उपस्थिती आणि अनुपस्थिती याची चर्चा जोरात केली जात होती.
(हेही वाचा – Badlapur प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? राज ठाकरेंचा संतप्त सवाल)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सध्या जनसन्मान यात्रा संपुर्ण महाराष्ट्रात सुरू झाली आहे. यातच जनसन्मान यात्रा राजगुरूनगरला आली तेव्हा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी (Shivajirao Adhalrao Patil) गैरहजेरी लावली. यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community