Shivani Raja : ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीने गीता घेत घेतली खासदारकीची शपथ

163
Shivani Raja : ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीने गीता घेत घेतली खासदारकीची शपथ
Shivani Raja : ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीने गीता घेत घेतली खासदारकीची शपथ

ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाच्या भारतीय वंशाच्या युवा नेत्या शिवानी राजा या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. गुजराती व्यावसायिक असलेल्या शिवानी राजा (Shivani Raja) यांनी ब्रिटनच्या संसदेमध्ये भगवत गीता हातात घेऊन शपथ घेतल्याने त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

(हेही वाचा – Mumbai Crime: लोकल ट्रेनसमोर आयुष्य संपवणाऱ्या बापलेकाच्या घरी सापडली चिठ्ठी, काय आहे चिठ्ठीत?)

लिसेस्टर ईस्ट मतदारसंघात ३७ वर्षांनंतर विजय

ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या हुजूर पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर मजूर पक्षाचे कीर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. या निवडणुकीत हुजूर पक्षाच्या भारतीय वंशाच्या गुजराती व्यावसायिक असलेल्या शिवानी राजा यांनी संसदेमध्ये भगवत गीता हातात घेऊन शपथ घेतली. शिवानी यांच्या विजयाने हुजूर पक्षाने लिसेस्टर ईस्ट मतदारसंघात ३७ वर्षांनंतर विजय मिळवला. शिवानी राजा यांनी लिसेस्टर ईस्ट मतदारसंघामध्ये लेबर पक्षाचे उमेदवार राजेश अग्रवाल यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत शिवानी राजा यांना १४ हजार ५२६ मतं मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी महापौर राजेश अग्रवाल यांना १० हजार १०० मते मिळाली. शिवानी राजा यांचा विजय महत्त्वाचे असण्याचे कारण म्हणजे १९८७ पासून लिसेस्टर ईस्ट या मतदारसंघावर मजूर पक्षाचे वर्चस्व आहे.

ब्रिटनच्या संसदेमध्ये खासदार म्हणून शपथ घेतल्यावर शिवानी राजा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्या म्हणाल्या की, लिसेस्टर ईस्टचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आज संसदेत शपथ घेणे माझ्यासाठी सन्माननीय आहे. गीतेवर हात ठेवून महामहीम राजे चार्ल्स यांच्या प्रति आपल्या निष्ठेची शपथ घेणं माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. (Shivani Raja)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.