Satara मध्ये शिवेंद्रराजे आणि अमित कदम यांच्यात लढत; उदयनराजेंच्या पाठिंब्यामुळे शिवेंद्रराजेंचे पारडे जड

मागील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ही लढत लक्षवेधक होणार असल्याचे दिसत आहे.

31
विधानसभा निवडणुकीत सातारा-जावली (Satara) मतदारसंघातील चित्र आता स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघातून ११ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता या ठिकाणी ८ उमेदवार रिंगणात आहेत. तरीही या ठिकाणी भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले आणि उबाठाचे अमित कदम यांच्या खरी लढत होणार आहे. मात्र या ठिकाणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना पाठिंबा दिल्यामुळे इथे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे.

कोण उमेदवार आहेत रिंगणात?

सातारा (Satara) विधानसभेच्या आखाड्यात आता 8 उमेदवार आहेत. त्यामध्ये महायुतीचे आ. शिवेंद्रराजे भोसले, मविआचे अमित कदम, बसपाचे मिलींद कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे बबन करडे, रासपचे शिवाजी माने तसेच अपक्षांमध्ये डॉ. अभिजीत आवाडे-बिचुकले, गणेश जगताप, कृष्णा पाटील यांचा समावेश आहे. राजेंद्र कांबळे, प्रशांत तरडे, अविनाश कुलकर्णी, वसंतराव मानकुमरे, हणमंत तुपे, सागर भिसे, दादासाहेब ओव्हाळ, विवेकानंद बाबर, सखाराम पार्टे, सोमनाथ धोत्रे यांनी  मागे घेतले.

महायुतीची हवा 

मागील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ही लढत लक्षवेधक होणार असल्याचे दिसत आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपा-महायुतीत आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. त्यांना खासदार उदयनराजे भोसले यांची साथ मिळाल्यामुळे ताकद मतवाढली असून (Satara)  मतदारसंघातील वातावरण पालटले आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आखलेले सर्वच राजकीय डावपेच यशस्वी ठरल्यामुळे मतदारसंघात भाजप-महायुतीची हवा निर्माण झाली आहे. त्यांनी मतदारसंघात जोरदार रान उठवले असून निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच प्रचाराचे रान तापवले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.