शरद पवारांच्या हातात केंद्राची आणि राज्याची प्रदीर्घ काळ सत्ता असतानाही मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटला नाही? उलट हा प्रश्न जास्त चिघळला. यामुळे अल्प उत्पन्न गटातील मराठा समाजाचे मोठे नुकसान केल्याचा आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी केला आहे. सातारा मतदारसंघाच्या महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळाव्यात शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
( हेही वाचा : CM Yogi Adityanath: सणासुदीच्या काळात वीज, गॅसबाबत योगी सरकारने केली मोठी घोषणा!)
पुढे शिवेद्रसिंहराजे (Shivendra Raje Bhosale) म्हणाले, शरद पवार अनेक वर्ष राजकारणात सक्रीय आहेत. मात्र, त्यांनी मराठा समाजाला राजकारणात दुय्यम लेखले गेले. मराठा- ओबीसी समाजात व जाती-जातीत वाद निर्माण केला. पवारांच्या याचं चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकंदरित सर्व समाजांना आणि महाराष्ट्राला विकासापासून दूर ठेवल्याची टीका ही शिवेंद्रसिंहराजे (Shivendra Raje Bhosale) यांनी केली.
तसेच सातारा मतदारसंघाच्या विकासासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) आणि मी कोठेही कमी पडणार नाही. आम्ही स्वार्थी विचार न करता जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ. मात्र शरद पवारांना फोडाफोडीचा नोबेल दिला पाहिजे, अशी टीका ही खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केली.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community