राज्यात रस्त्यांचे जाळे विकसित करून ग्रामीण भागांना शहरांशी जोडण्याचा महायुती सरकारचा मानस आहे. या विकासकामांद्वारे नागरिकांना विविध सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (Mumbai-Goa National Highway) कामास प्राधान्य देणार आहे, असे आश्वासन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी दि. ३१ डिसेंबर रोजी दिले. (Shivendra Raje Bhosale)
( हेही वाचा : Delhi Assembly Election : भाजपा आणि आप मध्ये ‘पोस्टर वॉर’)
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी दि. ३१ डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, राज्याची सर्वांगीण प्रगती ही पायाभूत सुविधांवर अवलंबून असते. राज्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याअनुषंगाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (Mumbai-Goa National Highway) कामांचा आढावा घेण्यात येणार असून चुकीच्या पद्धतीने काम होत असेल किंवा जमीन हस्तांतरणात अडचणी येत असतील तर त्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल. मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Goa National Highway) पूर्ण होणे राज्याच्या आणि जनतेच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने या महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचा पुनरुच्चार मंत्री भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी केला.(Shivendra Raje Bhosale)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community