Shivraj Singh Chauhan भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

119
Shivraj Singh Chauhan भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर भाजपा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या खांद्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी टाकण्याची तयारी करीत असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआला लोकसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळाले आहे. एनडीएने तिसऱ्यांदा २९३ जागांसह बहुमत मिळविले आहे. मोदी यांनी सरकार स्थापन केले आहे. मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना ग्रामीण विकास मंत्री बनविण्यात आले आहे.

मात्र आता भाजपा शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याची तयारी करीत असल्याची चर्चा आहे. भाजपा चौहान यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनविण्याची तयारी करीत आहे. याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. चौहान यांना अध्यक्ष बनविण्याचे दोन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. दुसरे कारण म्हणजे भाजपा आता नवीन नेतृत्वाच्या शोधात आहे.

(हेही वाचा – Independence Day : ‘लाँग वीकेंड’ची पद्धत पहिल्या स्वातंत्र्यदिनापासूनची?)

विदिशामधून मोठा विजय मिळवला

शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी लोकसभा निवडणुकीत विदिशामधून ८ लाख मतांनी विजय मिळवला आहे. ते सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी ते पाच वेळा खासदार झाले होते. मध्य प्रदेशात भाजपाने सर्व २९ जागा जिंकून क्लीन स्वीप केला आहे. मध्य प्रदेशातील लोकसभेच्या सर्व जागा एकाच पक्षाने जिंकण्याची १९८४ नंतरची ही पहिलीच वेळ आहे.

शिवराजसिंह चौहान(Shivraj Singh Chauhan) हे दोन दशकपासून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. नुकतीच त्यांनी विदिशा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूकही मोठ्या फरकाने जिंकली आहे.

(हेही वाचा – MHADA Lottery Mumbai: नागरिक झाले हैराण; म्हाडाच्या अॅपमध्ये बिघाड! )

शिवराज यांना अध्यक्ष करण्याची चर्चा का झाली?

जेपी नड्डा यांना २०२० मध्ये भाजपाचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. भाजपामधील राष्ट्रीय अध्यक्षांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. अशा परिस्थितीत त्यांचा कार्यकाळ आधीच संपला होता. मात्र, त्यानंतर लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला. अशाप्रकारे जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जूनमध्ये पूर्ण झाला आहे. अशा स्थितीत भाजपाला जून अखेर नवा अध्यक्ष निवडायचा आहे.

त्याचवेळी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला विजय मिळवून देऊनही शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांना मुख्यमंत्री करण्यात आले नाही. त्यांच्या जागी मोहन यादव यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली. तेव्हापासून शिवराज यांना मोठे पद मिळणार असल्याची चर्चा होती. आता इथे शिवराजसिंह चौहान यांना नवीन सरकारमध्ये मोठे मंत्रिपद मिळू शकते किंवा त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवले जाऊ शकते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.