शिवसेना भवन झाले ‘कोरोना मुक्त’?

150

शिवसेनेची बहुचर्चित पत्रकार परिषद सुरु होण्याआधी मोठ्या संख्येने शिवसैनिक, शिवसेना नेते आणि पदाधिकारी यांनी शिवसेना भवनाकडे प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी मात्र बहुतांश शिवसैनिकांनी तोंडाला मास्क लावला नव्हता, सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर बसवला होता. त्यामुळे सेना भवन हे कोरोना मुक्त झाले का, अशी चर्चा सुरु झाली होती.

सेना भवनावर गर्दी 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीकडून शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाई करत आहे. त्यामुळे अखेर दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी १५ फेब्रुवारी रोजी शिवसेना भवन येथे मोठी पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक, पदाधिकारी आले होते. सेना भवनामध्ये प्रचंड गर्दी केली होती.

याआधी राज्यात जेथे आंदोलने करण्यात आली त्यामध्ये गर्दी करणा-यांवर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, तसे गुन्हे शिवसैनिकांवर दाखल होणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.