Uddhav Thackeray : शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती; पक्षाच्या अधिवेशनात काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आधिवेधनाला नाशिक शहरातील हॉटेल डेमोक्रॉसी येथे सुरुवात झाली.

243

राम की बात झाली आता काम की बात करो. दहा वर्षांत तुम्ही काय केले. राम एक वचनी होते, तुम्ही कुठे एक वचनी आहात, शिवसेनेला दिलेले वचन पाळाले नाही. तसेच आमच्या शिवसैनिकामुळे तुम्हाला सत्ता मिळाली, दिल्ली बघायला मिळाली, पुचाट भाजपामुळे नव्हे. आमच्यामुळे सत्ता मिळाली त्या शिवसेनेचे नेते तुम्हाला भ्रष्ट वाटतात. पी.एम. केअर घोटाळा झाला, पाहिले त्या घोटाळ्याची चौकशी करा, त्याचा हिशेब का देत नाहीत. तसेच, आम्ही देखील तुमच्या घोटाळ्यांबाबत तक्रारी केल्या, पण त्याची चौकशी नाही झाली. आम्ही मात्र चौकशी करून तुम्हाला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. ही संपत्ती मला वारस्याने मिळाली आहे, चोरून मिळालेली नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निशाणा साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आधिवेधनाला नाशिक शहरातील हॉटेल डेमोक्रॉसी येथे सुरुवात झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. रामायणात प्रश्रू श्रीरामांनी वालीचा वध का केला, आम्हीही वालीचा वध केल्याशिवाय राहणार नाही, कारण या वालीने आमची शिवसेना पळवली आहे, अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वालीची उपमा दिली. यापूर्वीही एकनाथ शिंदेंना मिंधे म्हणत आणि आमचा बाप चोरला असे म्हणत शिवसेना पक्षातील कायदेशीर लढाईनंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला होता.

(हेही वाचा Ranjit Savarkar : लक्ष्मणाच्या नगरीत झालेले सैनिकी संचालन ही प्रभु रामचंद्राला दिलेली शक्तिवंदना – रणजित सावरकर)

काय म्हणाले संजय राऊत? 

प्रभू रामचंद्र यांचे शिवसेनेशी नाते आहे. शिवसैनिक अयोध्येत गेले नसते तर श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती. सोमवारी पंतप्रधान हे त्यामुळेच श्री रामाची प्राणप्रतिष्ठा करू शकले. नाशिक ही कुरुक्षेत्राची भूमी येथून रामाने संघर्ष सुरू केला. प्रभू रामचंद्राप्रमाणे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) संयमी असल्याचे मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.