उदय सामंतांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक 

एकनाथ शिंदे गटाचे आमदार उदय सामंत हे मंगळवारी, २ ऑगस्ट रोजी पुण्यात आले होते, त्यावेळी मात्र कात्रज चौकात सामंतांच्या गाड्यांचा ताफा पोहचताच त्यांच्या गाड्यांवर शिवसैनिकांनी दगडफेक केली. त्यावेळी सामंतांच्या गाड्याच्या काचा फुटल्या. यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता संघर्ष पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी उदय सामंत यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आदित्य ठाकरेंच्या सभेनंतर हल्ला 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात होते. त्यावेळी आमदार सामंत हेही मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबतच होते. त्यानंतर आमदार सामंत हे मुंबईच्या दिशेने जाऊ लागले. त्यावेळी कात्रजच्या चौकात आमदार सामंत यांची गाडी शिवसैनिकांनी अडवली. त्यानंतर त्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर चपला मारत बाटल्या फेकल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भोजनासाठी कात्रज चौकत असलेल्या तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी गेले होते. सामंत हे देखील त्यांच्यासोबत होते. तेथून ते मुंबईकडे जात असतानाच आदित्य यांची सभा संपवून निघालेल्या शिवसैनिकांच्या कचाट्यात सामंत यांची गाडी सापडली. कारण शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते. त्यांची सभा ही पुण्यातील कात्रज भागातच सुरू होती.

(हेही वाचा नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये येताच चीन आक्रमक, आशिया खंडावर युद्धाचे सावट)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here