BMC Election : ओबीसी आरक्षणाचा फटका शिवसेनेलाच

139

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण सोडत काढण्यात आल्यानंतर याचा सर्वांधिक फटका हा शिवसेनेला बसल्याचे दिसून येत आहे. ओबीसी शिवाय काढण्यात आलेल्या या पूर्वीच्या आरक्षणा सोडतीच्या तुलनेत शुक्रवारी काढण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणाच्या सोडती भाजपच्या सुमारे १२ प्रभागांमध्ये आरक्षणाचा फटका बसला आहे, तर शिवसेना नगरसेवकांच्या ३१ प्रभागांमध्ये आरक्षणाचा बदल झाला असून त्यातील २७ प्रभागांमध्ये आरक्षणाचा फटका बसला आहे. तर शिवसेनेचे चार प्रभाग आणि भाजपच्या दोन प्रभागांमधील माजी नगरसेवकांच्या पथ्यावर आरक्षण पडल्याचे पहायला मिळत आहे.

( हेही वाचा : घड्याळाचा अलार्म करून दिली सुषमा अंधारेंना शिवसेना प्रवेशाची जाग )

मुंबई महापालिकेच्या सार्व़त्रिक निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मे महिन्यांमध्ये काढण्यात आलेल्या ओबीसीशिवाय आरक्षण सोडतीमध्ये अनेक दिग्गजांना फटका बसला होता. त्यामुळे पुन्हा शुक्रवारी ओबीसीसह आरक्षण काढण्यात आल्याने यापूर्वी काहींचे प्रभाग महिला व खुल्या प्रवर्गात आरक्षित झाल्याने नगरसेवकांना आपले प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होती याची कल्पना होती. मागील आरक्षण सोडतीत ज्यांचे प्रभाग हातचे गेले होते, त्यांच्या आशा ओबीसी आरक्षणावर लागल्या होत्या. परंतु यातील ओबीसी आरक्षित प्रभाग कोणते होती याचीही कल्पना आल्याने बऱ्याच इच्छुक माजी नगरसेवकांनी आपली मानसिकता तयार करून ठेवली होती.

त्यामुळे शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या लॉटरी सोडतीत शिवसेना नगरसेवकांच्या ३१ प्रभागांमध्ये तर भाजपच्या १८ प्रभागांमध्ये आरक्षण बदल झाला आहे. मात्र मागील आरक्षण सोडतीत ज्यांचे प्रभाग बदलले गेले होते, परंतु या प्रभागात अनुकूल अशाप्रकारे प्रभागांचे आरक्षण पडले अशाप्रकारे शिवसेनेचे संजय अगलदरे, हाजी हालिम शेख, श्रीकांत शेट्ये आणि स्नेहल मोरे आदी चार नगरसेवकांच्या प्रभागांचा समावेश आहे. तर भाजपचे निल सोमय्या, विनोद मिश्रा व मकरंद नार्वेकर या तीन नगरसेवकांचे प्रभाग आता अनुकूल बनल्याने हे आरक्षण त्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येते.

आरक्षण बदलाचा फटका बसलेले शिवसेना नगरसेवकांचे प्रभाग व आरक्षण

  • एल विभाग : अश्विनी माटेकर, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : महिला
  • पी दक्षिण विभाग : स्वप्निल टेंबवलकर, आधीचे आरक्षण :महिला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी महिला
  • एफ उत्तर विभाग : रामदास कांबळे, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी महिला
  • जी दक्षिण विभाग :संतोष खरात,आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी
  • जी दक्षिण विभाग : स्नेहल आंबेकर, आधीचे आरक्षण : महिला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी महिला
  • जी उत्तर विभाग : मिलिंद वैद्य, आधीचे आरक्षण :महिला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी महिला
  • ई विभाग : सोनम जामसूतकर, आधीचे आरक्षण : महिला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी
  • के पश्चिम विभाग : प्रतिमा खोपडे, आधीचे आरक्षण : महिला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी महिला
  • एम पूर्व विभाग : विठ्ठल लोकरे, आधीचे आरक्षण : महिला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी महिला
  • एम पूर्व विभाग : वैशाली शेवाळे, आधीचे आरक्षण : महिला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी
  • एम पूर्व विभाग : समृध्दी काते, आधीचे आरक्षण : महिला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी महिला
  • एन विभाग : स्नेहल मोरे, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : महिला
  • एन विभाग : रुपाली आवळे, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : महिला
  • एन विभाग : तुकाराम पाटील, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी
  • एन विभाग : परमेश्वर कदम, आधीचे आरक्षण : महिला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी महिला
  • आर उत्तर विभाग : बाळकृष्ण ब्रीद, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी

आरक्षण बदलाचा फटका बसलेले भाजप नगरसेवकांचे प्रभाग व आरक्षण

  • आर उत्तर :हरिष छेडा, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी महिला
  • सी विभाग : आकाश पुरोहित, आधीचे आरक्षण : महिला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी
  • एन विभाग : बिंदू त्रिवेदी, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी
  • के पश्चिम विभाग : योगीराज दाभाडकर, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी
  • के पश्चिम विभाग : अनिष मकवानी, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी
  • एफ उत्तर विभाग :कृष्णवेणी रेड्डी, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी महिला
  • एफ उत्तर विभाग : नेहल शाह, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी
  • एच पश्चिम विभाग : अलका केरकर, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी
  • आर दक्षिण विभाग : प्रितम पंडागळे, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी महिला
  • आर दक्षिण विभाग : सागरसिंह ठाकूर, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी महिला
  • के पूर्व विभाग : ज्योती अळवणी, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी महिला
  • के पूर्व विभाग : सुनील यादव, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी
  • डि विभाग : सरीता पाटील, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी
  • पी उत्तर विभाग : प्रतिमा शिंदे, आधीचे आरक्षण : खुला, आत्ताचे आरक्षण : ओबीसी महिला

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.