उद्धव ठाकरेंना धक्का; पालघरमधील 50 पदाधिकारी शिंदे गटात सहभागी

144

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेतील अनेक नेते कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आता शुक्रवारी रात्री उशिरा पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित, वसई तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, वसई तालुका उपप्रमुख दिवाकर सिंग, बविआतून काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेले वसई- विरारचे माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांच्यासह 50 शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. शुक्रवारी रात्री उशीरा  त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दर्शवले.

( हेही वाचा: विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेचा दावा, उपसभापतींना लिहिले पत्र )

मीरा- भाईंदरचे अनेक नगरसेवक शिंदे गटात सहभागी

महाराष्ट्रातील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंद गटात जाण्याची तयारी केली आहे. मीरा- भाईंदरचे अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती आहे. पालघर जिल्ह्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांना कंबर कसावी लागणार आहे. कारण आता काही महिन्यांत पालिकेच्या निवडणुका होणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.