भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी ट्विट करुन वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले, असे म्हटले. सोबतच एक फोटोदेखील पोस्ट केला. नितेश राणेंच्या ट्विटमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करत दोन समाजात टेढ निर्माण केल्याची तक्रार शिवसैनिकांनी केली आहे. मुंबईतील काळाचौकी, वरळी आणि भोईवाडा पोलिस ठाण्यात नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली.
तरच माफी मागणार
एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, मी जे ट्विट केले त्यासंबंधी मी माफी मागेन पण, शिवसेनेने हिंदूंच्या भावना दुखावल्या त्याच काय त्यांनी आधी माफी मागावी, मग मी माफी मागायला तयार आहे, असे नितेश राणे यावेळी म्हणाले. समस्त हिंदू धर्माचा सातत्याने अपमान करत असल्याबद्दल आधी शिवसेनेने माफी मागावी नंतर माझ्याकडून अपेक्षा करावी, असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
तमाम #हिंदूच्या मॅांसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी मा. बाळासाहेबांच्या #ShivSena चं नाव बदलणार का? @UdhavThakre @mybmc pic.twitter.com/kjh2LAVCQp
— nitesh rane (@NiteshNRane) December 22, 2021
संघर्ष निर्माण होण्याची शक्यता
महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यानंतर आता राणे यांच्या ट्वीटवरून शिवसैनिक नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शिवसैनिक विरुद्ध राणे असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा: लहानग्यांचे जीव घेणा-या त्या दोघींना फाशीच! )
Join Our WhatsApp Community