एकीकडे रविवारी उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये भव्य जाहीर सभा होत असताना दुसरीकडे शिवसेना भाजपचं मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन होत आहे. अयोध्यवरून आणलेल्या धनुष्यबाणासह शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. रविवारी सकाळी पहिल्या टप्प्यात भव्य बाईक रॅलीसह आशीर्वाद यात्रा काढल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ६ वाजता ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच वरळीतून आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर जनजागृती करण्यासाठी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी आशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. महायुतीच्या आशीर्वाद यात्रेतील पहिल्या टप्प्यात रविवारी सकाळी अयोध्येतून आणलेल्या धनुष्यबाणासह घाटकोपर ते मुलुंड अशी भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये ३ हजार बाईकचा समावेश होता. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात वरळी ते मुंबादेवी मंदिरापर्यंत संध्याकाळी ६ ते १० यावेळेत आशीर्वाद यात्रा असणार आहे.
दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरे रविवारी जाहीर सभा घेणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचा जाहीर पक्षप्रवेशही होणार आहे.
(हेही वाचा – ..तर उद्धव ठाकरेंना मला आणि माझ्या मुलाला संपवण्यात यश आलं असतं; रामदास कदमांचा गंभीर आरोप)
Join Our WhatsApp Community