सेना, काँग्रेस नेत्यांच्या पंकजा मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा! काय आहे गौडबंगाल?

76

सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजपमध्ये भूकंप घडवून देण्याचा इशारा देत पंकजा मुंडे यांनी केंद्रीय नेतृत्वाकडून कसा सन्मान केला जातोय हे पाहण्यासाठी ‘वेट अँड वॉच’ ही भूमिका घेतली आहे. तेव्हापासून शिवसेना असो कि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे मुंडे भगिणींकडे लक्ष लागले आहे. बहुजनांचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या या मुंडे भगिनी उद्या भाजपला सोडतील, तर त्या ज्या कुठे जातील तिथे पक्षाची ताकद वाढवतील, म्हणूनच कि काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असो कि शिवसेनेचे मराठवाड्याचे नेते चंद्रकांत खैर असो, या दोन महत्वाच्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन राजकीय संदेश दिला आहे का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

पंकजा मुंडे होत्या नाराज!

२०१९च्या विधानसभेत पराभव, त्यानंतर वर्षभर भाजपकडून दुर्लक्ष, असा कटू अनुभव घेणाऱ्या पंकजा मुंडे यांना जेव्हा नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला, तेव्हा मात्र त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी आशा होती, मात्र त्यातही निराशा झाली. त्यामुळे नाराज मुंडे भगिनी तडक दिल्लीला रवाना झाल्या. त्यांना थेट मोदी, शहा यांनी भेट दिली. त्यानंतर महाराष्ट्रात आल्यावर मात्र पंकजा मुंडे यांनी भाजपच्या नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘भाजपमध्ये जेव्हा राम नाही, असे दिसेल तेव्हा वेगळा विचार करू. धर्मयुद्धात बरीच हानी होईल, म्हणून मी शक्य होईल तेवढा काळ युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे’, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला होता.

(हेही वाचा : कोकण महापुरात तेव्हा कोकणचे ‘ते’ नेते होते घरात!)

काय म्हणाले नाना पटोले, चंद्रकांत खैरे!

तेव्हापासून मुंडे भगिनींच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंकजा मुंडे यांना शुभेच्छा दिल्या. ‘आमच्या भगिनी पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आपणांस उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’ तर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘माझे मोठे बंधू गोपीनाथ मुंडे यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन समाजसेवा करणाऱ्या आमच्या कन्या @Pankajamunde ताई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद!!’ पंकजा मुंडे यांना आवर्जून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यामागे शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांचा हेतू काय आहे, यावर आता चर्चा सुरु झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.