शिवसेना-राष्ट्रवादीने गोव्यात किती मते मिळवली?

महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार आगपखड करण्यात येत आहे.

106

देशातील 5 विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपचं कमळ खुलणार असल्याचे समजत आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गोवा विधानसभेत भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचे दिसत असल्याने महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार आगपखड करण्यात येत आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्पर्धा ही नोटासोबत असणार आहे, असे ट्वीट करत महाराष्ट्र भाजपकडून बोचरी टीका करण्यात आली आहे.

(हेही वाचाः Election Result 2022: गोव्यात भाजपच्या बंडखोर पर्रिकरांचे पंख छाटले)

नोटाचा कोटाही पूर्ण नाही

या दोन्ही पक्षांची स्पर्धा नोटासोबत असणार आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितले होते.

नोटा : 6439 मते (1.1%)
राष्ट्रवादी काँग्रेस : 5058
शिवसेना : 1099 (0.2%)
दोन्ही मिळून : 6157 (1%)

हर्बल इफेक्ट नुसार दोन्ही पक्षांचे नेते, 2024 ला पंतप्रधान होतील, असे खोचक ट्वीट करत भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

(हेही वाचाः आसाम नगरपालिका निवडणुकीत ‘कमळ’ फुललं, 80 पैकी 77 जागांवर विजय)

गोव्यात भाजपचा डंका

शिवसेनेने गोवा आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची केली होती. शिवसेनेचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी स्वतः या दोन्ही राज्यांमध्ये जाऊन प्रचार केला होता. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील गोव्यात उत्पल पर्रिकर यांना चांगले यश मिळेल असे म्हटले होते. पण उत्पल पर्रिकर यांचा दारुण पराभव झाल्याने आता गोव्यात भाजपचा डंका वाजणार असल्याचे दिसत आहे.

भाजपमध्ये फडणवीसांचे वजन वाढणार

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबतच महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गोवा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे गोव्यात भाजपला मिळालेल्या यशामुळे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे वजन वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः ‘या’ राज्यातील मुख्यमंत्रीच पिछाडीवर! तर कोण आहे आघाडीवर?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.