सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यावर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिवसेनेच्या शिवसैनिकांनी ठाण्यात शिवाई नगर येथील शाखेचा ताबा घेण्यासाठी गेले असता ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यामुळे त्याठिकाणी राडा झाला.
शिवाई नगर हा भाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखाली असल्याचा समजला जात आहे. त्यामुळे त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. या ठिकाणच्या शाखेवर मालकी कुणी सांगायची यावर आता वाद सुरु झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता शिंदेंची शिवसेना सक्रिय झाली आहे. आम्हाला शिवसेना हे नाव वापरायला आणि धनुष्यबाण वापरायला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा कारभार सांभाळला आहे. त्यांना शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला शिवसेना हे नाव वापरण्याचा अधिकार दिला आहे, असे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले. ही शाखा गेली ३५ वर्षे शिवाईनगरमध्ये कार्यरत आहे. त्या शाखेवर कोणत्या तरी व्यक्तीने अनधिकृतपणे कुलूप तोडून ताबा घेतला आहे. माझे म्हणणे एकच आहे, कुलूप तोडून अशाप्रकारे ताबा घेण्याचा कायदा असेल तर तो कायदा आम्हाला दाखवा. त्यांच्याकडे कोर्टाची ऑर्डर असेल तर ती ऑर्डर आम्हाला दाखवावी, असेही म्हस्के म्हणाले.
Join Our WhatsApp Community