प्रभादेवीत Shivsena आणि उबाठा गटांचे कार्यकर्ते भिडले; बोर्डावरील धनुष्यबाण चिन्हावरून वाद

227
Assembly Elections 2024 : पराभूत,तरीही खरे योध्दा ठरले शिवसेनेचे दोन शिलेदार
Assembly Elections 2024 : पराभूत,तरीही खरे योध्दा ठरले शिवसेनेचे दोन शिलेदार

मुंबईतील प्रभादेवीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने विरुद्ध उबाठा गटाचे पदाधिकारी आमने-सामने आले. फूटपाथवर लावलेल्या बोर्डावरील धनुष्यबाणाचं चिन्ह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काढल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. हा फलक स्थानिक आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी स्वखर्चातून बोर्ड बसवल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. मात्र, सत्तांतरानंतर इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी होर्डिंग लावत होते. त्यातच उबाठा गटाने अहुजा टॉवर इथल्या होर्डिंगवरील धनुष्यबाण चिन्ह हटवल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

होर्डिंगवरील धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळेस काढल्याने स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाले.

यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीही आक्षेप घेऊन, स्थानिक पोलिसांना पत्र व्यवहार करत ही बाब निदर्शनास आणून दिली. दरम्यान, मंगळवारी रात्री ठाकरेंचे पदाधिकारी मध्यरात्री 11 च्या सुमारास आहुजा टॅावर येथील शिवसेना पक्षाच्या होर्डिंगवरील धनुष्यबाण हे चिन्ह काढून तिथून हटवल्याचे समोर आले आहे.

काय आहे प्रकरण ?
फुटपाथवर लावण्यात आलेल्या होर्डिंगवरील धनुष्यबाणाचं चिन्ह कापून तिथून पळ काढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले. त्या वेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी उबाठाच्या पदाधिकाऱ्यांना खडसावत धनुष्यबाण चिन्ह का काढलं ? याबाबत जाब विचारला. पण, काहीच उत्तर मिळालं नाही. अखेर शिवसेनेचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर माहीम पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी शैलेश माळी, अमर लब्देसह अन्य एकावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.